शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर ते किती घातक ठरू शकतं हे तुम्ही इंटरनेटवरील वेगवेगळ्या पोस्ट किंवा व्हिडिओतून वाचलं आणि पाहिलं असेलच. अनेक हेल्थ एक्सपर्ट कोलेस्टेरॉलची लेव्हर कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगतात. असाच एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे मेथीच्या बिया. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. यांनी नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं.
मेथीच्या बियांनी कसा मिळतो फायदा
मेथीच्या बिया कशा खाव्यात आणि त्याचे शरीराला कोणकोणते फायदे होतात.
मेथीच्या बियांमधील पोषक तत्व
मेथीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. यात व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी आणि इतरही काही व्हिटामिन असतात. तसेच यात भरपूर फायबर, कॅल्शिअम, फोलिक अॅसिड, कॉपर आणि पोटॅशिअम असतं. मेथीच्या बियांमध्ये मध्ये असे कंपाउंड आढळतात जे लिव्हरच्या माध्यमातून कोलेस्टेरॉलचं एक्ट्रा प्रॉडक्शन रोखण्यास मदत करतात. याने आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं अॅब्जॉर्ब्शन कमी होतं. मेथीच्या बियांमध्ये आढळणारं स्टेरॉयडल सॅपोनिन हे तत्व आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. या बियांमुळे नसांमध्ये गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. मेथीच्या बिया लिव्हरमध्ये असलेल्या एलडीएल रिसेप्टर्सना बूस्ट करण्यास मदत करतात. सोबतच याने लिपिड प्रोफाइलमध्येही सुधारणा होते.
कशा खायच्या मेथीच्या बिया
फेनुग्रीक सीड्स म्हणजेच मेथीच्या बियांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी या सकाळी उपाशीपोटी खाव्यात. तुम्ही रात्रीच्या वेळी एक चमचा मेथीच्या बिया एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर हे पाणी प्या आणि दाणे चावून खा. याने हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबिटीज, हार्ट फेलियर आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका टाळला जाऊ शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…