आरोग्य

उसाच्या रसाचे अनेक फायदे

रसायनाचा वापर झालेले थंड पेय पिण्यापेक्षा ऊसाचा रस पिके कधीही उत्तम. ऊसाचा रस हा खूप लोकप्रिय आहे आणि दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे.. हा रस केवळ थंडावा देत नाही, तर अनेक आजारांवरही गुणकारी ठरतो. ऊसाच्या रसात 95% पाणी, 5% नैसर्गिक साखर आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे व खनिजे असतात. यामुळे तो शरीरासाठी ऊर्जा, पोषण आणि विविध आजारांवरील नैसर्गिक उपचार म्हणून उपयुक्त ठरतो.

ऊसाचा रस हा नैसर्गिकरित्या गोड असतो, त्यात कोणतेही कृत्रिम पदार्थ मिसळण्याची गरज नसते. यामध्ये खालील पोषकतत्त्वे आढळतात

कॅल्शियम: हाडे व दात मजबूत करण्यासाठी.

मॅग्नेशियम: स्नायू व मज्जासंस्थेसाठी उपयुक्त.

पोटॅशियम: शरीरातील द्रव संतुलन आणि हृदयासाठी फायदेशीर.

लोह (आयर्न): रक्तातील हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत.

अँटीऑक्सिडंट्स: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी.

फॉस्फरस: पेशींच्या वाढीस मदत करणारा घटक.

जीवनसत्त्वे: विशेषतः A, B, C आणि D जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

ऊसाच्या रसाचे सविस्तर फायदे

1) नैसर्गिक उर्जादायक पेय ऊसाचा रस झटपट ऊर्जा देतो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतो. खेळाडूंना आणि जास्त मेहनत करणाऱ्यांसाठी उत्तम ऊर्जा स्रोत आहे.

2) लिव्हर (यकृत) साठी वरदान. पीलिया (हिपॅटायटीस) झालेल्या रुग्णांसाठी ऊसाचा रस प्रभावी उपाय आहे. लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करतो. हानिकारक विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकतो.

3) रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. शरीरातील अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढवतो. सर्दी, खोकला, ताप आणि सामान्य संसर्गांपासून संरक्षण करतो.

4) मूत्रपिंड (किडनी) साठी फायदेशीर.नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे, त्यामुळे किडनी स्वच्छ ठेवतो. लघवीच्या समस्या (युरिनरी इन्फेक्शन, दाह) कमी करतो.

5) त्वचा आणि केसांसाठी उपयोगी. त्वचेची नैसर्गिक चमक वाढवतो आणि मुरुम, पिग्मेंटेशन, डाग-धब्बे कमी करतो. केस गळणे कमी करतो आणि केसांना पोषण मिळते. कोरफड आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरतो.

6) बद्धकोष्ठता व पचन सुधारतो. फायबरयुक्त असल्यामुळे पचनसंस्था सुधारतो आणि बद्धकोष्ठता दूर करतो. आम्लपित्त (अॅसिडिटी) कमी करतो आणि गॅसची समस्या दूर करतो.

7) हृदयाचे आरोग्य सुधारतो. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो. हृदयविकाराचा धोका कमी करतो. रक्तदाब संतुलित ठेवतो.

8) हाडे आणि दात मजबूत करतो. कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहतात. लहान मुलांसाठी विशेष फायदेशीर.

9) कॅन्सरविरोधी गुणधर्म. यामधील फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स कॅन्सर विरोधात लढण्यास मदत करतात. विशेषतः प्रोस्टेट आणि स्तन कॅन्सर टाळण्यासाठी मदत करू शकतो.

ऊसाचा रस कसा आणि कधी प्यावा

सकाळी किंवा दुपारी प्यायल्यास जास्त फायदेशीर.

कोरड्या आणि गरम हवामानात शरीरातील थंडावा टिकवतो.

लिंबू, आले किंवा तुळशी घालून प्यायल्यास अधिक फायदेशीर.

शक्यतो ताजा रस प्यावा, कारण तो लवकर आंबतो.

ऊसाचारस कोणी टाळावा

डेंग्यू किंवा मलेरियाच्या तापात ऊसाचा रस टाळावा.

टाइप 1 डायबेटिस रुग्णांनी जास्त प्रमाणात घेऊ नये.

जास्त प्रमाणात घेतल्यास साखर वाढू शकते.

उसाचा रस केवळ एक स्वादिष्ट थंडगार पेय नसून, तो आरोग्यासाठी अमृतासारखा आहे. त्याचे पचनसंस्थेपासून हृदय, यकृत, त्वचा, किडनी आणि रोगप्रतिकारशक्ती पर्यंत अनेक फायदे आहेत. मात्र, तो स्वच्छतेने आणि योग्य प्रमाणातच घ्यावा.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

16 सेकंद ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

3 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

11 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

15 मिनिटे ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

18 मिनिटे ago

प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप; ‘नोटीस मिळणाऱ्या मतदारांची बूथनिहाय यादी जाहीर करा’

मुंबई: एसआयआर (Special Intensive Revision) मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या…

23 मिनिटे ago