आरोग्य

औषधांचे अतिसेवन केल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो का? जाणून घ्या…

तुम्ही शारीरिक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरसारख्या औषधी सातत्याने घेता का? जर हो, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. पेनकिलरच्या दीर्घकाळ वापरामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते. रक्तातील प्लेटलेट्समध्ये अडथळा निर्माण शकतो, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊ शकतो; ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो.

आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी औषधे आवश्यक आहेत; पण काही वेळा याचे हृदयावर दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे कार्डिओमायोपॅथी होऊ शकते. कार्डिओमायोपॅथी हा हृदयरोग आहे; जो हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करतो आणि त्यामुळे हृदयाला शरीराच्या इतर अवयवांना रक्त पुरविणे आणखी कठीण होऊन बसते.

औषधांचा हृदयावर कसा परिणाम होतो.

औषधे हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करतात. अतिऔषधांच्या सेवनाने हृदयाचे ठोके अनियमित होतात. काही औषधे हृदयाच्या पेशींनासुद्धा हानी पोहोचवू शकतात; तर काही औषधे हृदयावर परिणाम करतात. उदा. द्रवपदार्थ टिकवून ठेवणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन किंवा रक्तदाब वाढवणे इत्यादी.

परराज्यातील रक्त हस्तांतरणावरील बंदी उठवली.

१) केमोथेरपी एजंट: अँथ्रासायक्लिन (anthracyclines) आणि ट्रॅस्टुझुमॅब (trastuzumab)सारखी औषधे कार्डियोटॉक्सिसिटीसाठी (cardiotoxicity) कारणीभूत ठरतात. कार्डियोटॉक्सिसिटी म्हणजे हृदयाचे नुकसान होणे; ज्यामुळे हृदयाचे कार्य कमी होते आणि हृदय बंद पडण्याचा धोका वाढतो.

२) नॉन-स्टेरॉइडल अँटी-इम्फ्लेमेटरी ड्रग्स: ही औषधे अनेकदा शारीरिक त्रास कमी करण्यासाठी वापरली जातात. पण त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका आणखी वाढू शकतो

३) ॲरिथिमिक औषधे: हृदयाचे अनियमित ठोके पडण्यात सुधारणा होण्यासाठी घेत असलेल्या ॲरिथिमिक (Antiarrhythmic) औषधांमुळे काही वेळा प्रो-ॲरिथमिया (proarrhythmia) होतो. प्रो-ॲरिथमिया म्हणजे हृदयाचे अनियमित ठोके आणखी तीव्रतेने वाढणे होय.

4) मधुमेहावरील काही औषधे: मधुमेहावरील काही औषधांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

५) कॉर्टिकोस्टिरॉइड्स: या औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने द्रवपदार्थ जास्त वेळ रक्तवाहिन्यांमध्ये टिकून राहतात आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो.

६) माइटोकॉन्ड्रियल डिसफंक्शन: कोकेनसारख्या पदार्थांमुळे मायटोकॉन्ड्रिया (mitochondria) किंवा हृदयाच्या पेशींच्या ऊर्जास्रोतांवर परिणाम होतो आणि त्यांचे नुकसान होते.

७) हायड्रॅालाझिन: हायड्रॅालाझिन (hydralazine)सारखी काही औषधे जसे की, हे शरीरातील निरोगी पेशी खराब करतात

८) अँटीसायकोटिक्स: क्लोझापाइन (clozapine) व ओलान्झापाइन (olanzapine) सारखी औषधे हृदयाचे ठोके अनियमित करतात.

९) इतर औषधे: मेथॅम्फेटामाइन, बीटा-ब्लॉकर्स व एसीई इनहिबिटरसारखी काही अँटीहायपरटेन्सिव्ह औषधे आणि सायक्लोस्पोरिनसारख्या इम्युनोसप्रेसंट्समुळे ठरावीक परिस्थितीत कार्डियोटॉक्सिक प्रभाव दिसू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

1 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

23 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago