आरोग्य

लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ गोष्टी

हल्ली मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असं काहीही न बघणारे लहान मूल क्वचितच एखादं सापडेल. बहुतांश मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या स्क्रीनचं अक्षरश: वेड लागलं आहे. उठल्या उठल्या आधी मोबाईल बघणारे आणि दिवसभर कामानिमित्त लॅपटॉपच्या स्क्रिनला चिटकून बसणारे, त्यानंतरही घरी आल्यावर टीव्ही पाहून रिलॅक्स होणारे पालक घरात असल्यावर मुलं वेगळं तरी काय करणार. पण लहान मुलांचे डोळे नाजूक असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात स्क्रिन पाहिल्याने त्यांच्यामध्ये मायोपिया हा दृष्टीदोष वाढतो आहे.

मायोपिया म्हणजे नेमकं काय

मायोपिया हा दृष्टीशी संबंधित एक आजार असून यामध्ये मुलांना दुरचं दिसायला त्रास होतो. आधीच स्क्रीन बघण्याचं वाढलेलं प्रमाण, मैदानी खेळ न खेळणं आणि त्यात योग्य आहाराची कमतरता. यामुळे हा आजार मुलांमध्ये खूपच वाढला आहे, असं या अभ्यासात सांगण्यात आलं असून २०५० पर्यंत तर हा आजार खूपच वाढणार असल्याचं नेत्रतज्ज्ञ सांगतात. पुस्तकं वाचताना किंवा लिखाण करताना काही मुलं पुस्तक डोळ्याच्या खूपच जवळ धरतात. यामुळेही डोळ्यांना हा त्रास होऊ शकतो.

मुलांना मायोपियाचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी 

1) मुलांना काही त्रास होवो अथवा न होवो, पण दर ६ महिन्यांनी मुलांची डोळे तपासणी करायलाच पाहिजे.

2) मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी किंवा घराबाहेर पडून काहीतरी खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करा.

3) मुलांचा स्क्रिनटाईम खूप मर्यादित करा. कारण हल्ली मुलांना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यापासून दूर ठेवताच येत नाही. पण त्यांचं गॅझेट्स बघण्याचं प्रमाण मात्र मर्यादित ठेवा.

4) डोकेदुखी, टीव्ही बघताना डोळे बारीक करून टीव्ही- मोबाईल बघणं किंवा डोळ्यांतून सतत पाणी येणं अशी लक्षणं मुलांमधे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

5) मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषक ठरणारे पदार्थ मुलांना जास्त प्रमाणात खायला द्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…

8 तास ago

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…

8 तास ago

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

12 तास ago

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…

12 तास ago

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…

12 तास ago