आरोग्य

५ सवयी स्वत:ला लावून घ्या, समोरच्यावर पडेल इम्प्रेशन- सगळेच तुम्हाला म्हणतील ‘स्मार्ट क्लासी वुमन’

काही महिला अशा असतात की त्यांची आणि आपली मुळीच ओळख नसते. अशाच कुठेतरी, कधीतरी त्या आपल्या अचानक समोर आलेल्या असतात. त्यांच्याशी आपण एक अक्षरही बोललेलो नसतो. फक्त त्यांच्या काही कृती आपण दुरून बारकाईने पाहिलेल्या असतात. पण तरीही त्या महिलांची एक वेगळीच प्रभावी छाप आपल्या मनात कायम घर करून राहाते. त्या महिलेची एक वेगळीच आदरयुक्त इमेज आपल्या डोक्यात तयार झालेली असते. असं काय वेगळं असतं बरं त्या महिलांमध्ये ज्यामुळे त्या चारचौघींमध्ये चटकन उठून दिसतात.

स्मार्ट क्लासी महिलांसाठी 5 नियम 

१) एटिकेट्स आणि मॅनर्स असणं खूप गरजेचं आहे. अनेकजणी खूप शिकलेल्या असतात. पण प्रत्येकाशी कसं वागावं याचं त्यांना भान नसतं. तुमच्या वागण्यात एक मृदूता असायला हवी. त्यामुळे समोरच्याचं मन तुम्ही आपोआप जिंकून घेऊ शकता.

२) सॉफ्ट स्पोकन म्हणजेच आपलं म्हणणं योग्य शब्दांत, योग्य भाषेत आणि आवाजाच्या योग्य पीचमध्ये दुसऱ्यांपर्यंत पाेहोचवता आलं पाहिजे. उगाच जोरजोरात बोलून आपलं म्हणणं तावातावात मांडून समोरचा इंम्प्रेस होत नसतो. त्यामुळे उलट समोरच्याचं आपल्याविषयीचं मत आणखी खराब होतं.

3) आपले कपडे आणि इतर ॲक्सेसरीज यावर नेहमी लक्ष द्या. कपड्यांची निवड अधिक चोखंदळपणे करा. कारण आपले कपडे पाहूनच समोरचा आपल्या बद्दलची पहिली इमेज त्याच्या डोक्यात तयार करत असतो. कपड्यांसोबतच तुमच्या ॲक्सेसरीजवर सुद्धा लक्ष द्या. तुमच्याकडे मोजक्याच ॲक्सेसरीज असल्या तरी चालेल. पण त्या उत्तम दर्जाच्या असाव्या.

४) सकारात्मक विचार असणं खूपच गरजेचं आहे. कारण बहुतांश लोकांना अशाच व्यक्ती आपल्या आसपास हव्या असतात ज्यांच्यामध्ये सकारात्मकता असेल, ज्यांच्या बोलण्याने किंवा कृतीतून समोरच्याला नवी उमेद मिळेल. कायम रडत, कुढत राहणाऱ्या व्यक्ती नकोशा वाटतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक, आनंदी राहण्यावर भर द्या.

५) स्वत:कडे लक्ष द्यायला हवं. आपल्या कामातून वेळ काढून स्वत:कडे लक्ष द्या. स्वत:कडे लक्ष देणं म्हणजे टाईमपास करणं नसतं. तर स्वत:वर केलेली ती टाईम इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होण्यासाठी मदतच होते. स्वत:साठी काढलेल्या वेळेतून काहीतरी चांगलं वाचा, तुमच्या आवडीचं काम करा. तुमचा छंद जोपासा किंवा अगदी पार्लरमध्ये जाऊन स्वत:वर थोडा खर्च करा.. या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच तुम्हाला तुमचा आनंद मिळेल. तुम्हाला आणखी पॉझिटीव्ह वाटेल

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

6 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

6 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

12 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

12 तास ago