आरोग्य

नैसर्गिक सुपरफूड शेंगदाणा

प्रत्येक घरात असतो एक नैसर्गिक सुपरफूड तो म्हणजे शेंगदाणा. आजकाल अनेक जण अंडी खात नाहीत, काही दूध पित नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, कॅल्शियम, बी-१२ आणि इतर पोषक तत्वं मिळणार तरी कुठून? याचं उत्तर आहे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा शेंगदाणा. हाच शेंगदाणा तुमच्या आरोग्याचा रक्षक आहे.

सगळ्याच वयोगटासाठी योग्य लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी शेंगदाण्याचा समावेश आहारात जरूर करावा. हे नैसर्गिक, स्वस्त आणि आरोग्यदायी पोषण आहे. शेंगदाणा म्हणजे गरिबांचा काजू नव्हे, तर आरोग्याचा राजा आहे. जर अंडी किंवा दूध टाळत असाल, तरीही आरोग्य टिकवायचं असेल, तर रोज मूठभर शेंगदाणे खा आणि तुमचं आरोग्य जपा.

नैसर्गिक प्रोटीनचा भंडार: शेंगदाण्यात भरपूर प्रोटीन असतं, जे मांसाहार न करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. दररोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास शरीरातील पेशींना बळकटी मिळते आणि स्नायू मजबूत होतात.

हाडांसाठी नैसर्गिक कॅल्शियम: दूध न पिणाऱ्यांसाठी शेंगदाणे ही उत्तम कॅल्शियमची पर्यायी सोय आहे. हे हाडं मजबूत करतं आणि सांधेदुखी टाळण्यात मदत करतं.

मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर: शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स, विटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट्स हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर असून हृदयासाठीही लाभदायक ठरतात.

उर्जा वाढवणारा आणि पचनासाठी उपयोगी: शेंगदाणे खाल्ल्या नंतर दिवसभर उत्साही राहता येते. त्यातील फायबर्समुळे पचनक्रियाही सुरळीत राहते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

13 तास ago