आरोग्य

लठ्ठपणा एक आजार असून लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे.

1) पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

2) दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

3) पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

4) वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

5) आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

6) दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

7) जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.

8) वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

9) दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.

10) सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…

9 तास ago

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…

9 तास ago

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

13 तास ago

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…

13 तास ago

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…

13 तास ago