आरोग्य

PCOD कारण, लक्षण आणि उपाय

पी. सी. ओ. डी. ची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात, त्या मधील काही लक्षणे पुढील प्रमाणे 

अनियमित पाळी: नेहमीच्या तारखेला पाळी न येणे, किंवा नेहमीच्या तारखेपेक्षा खूप उशिराने पाळी येणे हे पी. सी. ओ. डी. चे प्रकर्षाने जाणवणारे लक्षण आहे. अनेकदा पाळी दोन ते सहा महिने येत नाही. अशावेळी तातडीने डॉक्टरांना दाखवणे अतिशय गरजेचे आहे. पी. सी. ओ. डी. च्या महिलांना पाळी आल्यानंतर रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होतो.

केस गळती: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये डोक्यावरील केसांच्या गळतीचे प्रमाण आढळते. केसांची योग्य निगा राखून सुद्धा केस गळती होते. पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये पुरुषी हार्मोन्स चे प्रमाण वाढल्याने डोक्याच्या मागच्या भागातले म्हणजेच भोवरा असलेल्या भागातले केस पुरुषांप्रमाणे गळू लागतात.

त्वचेमधील बदल: असंतुलित हार्मोन्स मुळे पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना चेहऱ्यावर, मानेवर तसेच पाठीवर पुरळ येण्याचे प्रमाण वाढते. तसेच मानेच्या मागच्या बाजूला, काखेत, खाजगी भागात काळपटपणा जाणवतो.

वजनात चढउतार: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये लठ्ठ असण्याचे प्रमाण अधिक महिलांमध्ये आढळून येते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा वजन कमी होत नसेल तर हे नक्कीच पी. सी. ओ. डी. चे लक्षण आहे.

अतिरिक्त केसांची वाढ: वर सांगितल्याप्रमाणे पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील केसांची गळती होते परंतू, चेहऱ्यावर, पाठीवर, पोटावर, छातीवर केसांची अतिरिक्त वाढ होते.

तीव्र डोकेदुखी: वारंवार डोकेदुखी किंवा अर्धशिशी चा त्रास पी. सी. ओ. डी. च्या महिलांमध्ये आढळतो.

प्रजनन प्रक्रियेत अडथळा: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना गर्भधारण करण्यात अडथळे येऊ शकतात.

मधुमेह: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना मधुमेह असण्याची शक्यता असते.

ताण: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना नैराश्य, तणाव मोठ्या प्रमाणात जाणवतं.

पी. सी. ओ. डी. वर उपाय

पी. सी. ओ. डी. बरा होण्यासाठी विशिष्ठ औषधे बनलेली नाही. परंतू योग्य आहार घेतल्यास आपण पी. सी. ओ. डी. वर नियंत्रण आणू शकता.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जसं कि, धान्य, शेंगा, विविध प्रकारच्या बिया, फळं, प्रक्रिया न केलेले पदार्थ यांचे सेवन करावे.

ओमेगा फॅटी ऍसिड असलेल्या माश्यांचे सेवन करावे. या मध्ये टुना मासा, सार्डीनस मासा, साल्मोन मासा, बांगडा मासा, या माश्यांचा समावेश करावा.

डार्क चॉकोलेट चे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.

चांगले चरबीयुक्त पदार्थ, ऑलिव्ह ऑइल, सुका मेवा, बदाम, पिस्ता यांचे सेवन करावे.

सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, जसे कि पालक, शेवग्याचा पाला, ब्रोकोली, शेपू यांचा आहारामध्ये समावेश करावा.

कच्च्या फळभाज्यांचे सेवन जेवणाच्या आधी किंवा रिकाम्या पोटी करावे. कच्च्या फळभाज्यांमध्ये काकडी, गाजर, बीट, कोबी, पांढरा कांदा यांचा समावेश होतो.

दालचिनी, लवंग, हळद या सारख्या गरम मसाल्यांचा समावेश आहारात करावा.

नियमित व्यायाम करावा आणि वजन नियंत्रित ठेवावे.

योग केल्याने ताण तणाव कमी होतो. ताण तणाव कमी होणे पी. सी. ओ. डी. च्या महिलांसाठी अतिशय गरजेचे आहे, त्या मुळे पी. सी. ओ. डी. असलेल्या महिलांना नियमित योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.

शक्य तितके पाणी पिऊन शरीराला पाण्याचा पुरवठा करावा.

पी. सी. ओ. डी. च्या महिलांनी काय टाळावे

उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये. तेलकट पदार्थ खाऊ नये.

बर्गर, पिझ्झा या सारखे पदार्थ आणि मैदा असलेले पदार्थ खाऊ नये.

साखर असलेले पदार्थ कमी करावे. साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करावा.

सोडा असलेले द्रव्य / कोल्ड्रिंक्स पिऊ नये.

धूम्रपान आणि अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन करू नये.

कॅफिन चे सेवन कमी करावे.

लाल मासाचे सेवन करू नये.

सतत एकाजागी बसून राहणे टाळावे.

पी. सी. ओ. डी. चे निदान कसे करावे

चेहऱ्यावरील, पाठीवरील, पोटावरील अतिरिक्त वाढलेल्या केसांवरून पी. सी. ओ. डी. असल्याचे लक्षात येते. असे आढळून आल्यास आपल्या डॉक्टरांना त्वरित दाखवावे.

रक्ततपासणी: आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारून पी. सी. ओ. डी. साठी रक्तचाचण्या करून घेऊन त्याचे निदान करावे.

अल्ट्रासाउंड: पी. सी. ओ. डी. ची लक्षणे दिसल्यास डॉक्टर पहिल्यांदा अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला देतात. यातून अंडाशयातील सिस्ट चा आकार लक्षात येतो. किंवा अंडाशयात काय त्रास आहे याचा अंदाज येतो आणि पी. सी. ओ. डी. वर उपचार करता येतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

1 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

2 तास ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

18 तास ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

20 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

23 तास ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

1 दिवस ago