दह्याचं सेवन भरपूर लोक आवडीने करतात. दह्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पदार्थां सोबत सेवन केलं जातं. दही खायला तर टेस्टी लागतच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी६, बी१२ सारखे पोषक तत्व असतात. दही खासकरून डायजेशनसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण यात प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया वाढवतात. मात्र, दह्याचे जसे भरपूर फायदे आहेत, तसेच त्याचे काही नुकसानही आहेत. ज्यामुळे दह्याचा आहारात समावेश करताना काळजी घेतली पाहिजे. खासकरून खालील चार समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं चुकूनही सेवन करू नये.
आर्थरायटिस
संधिवाताची समस्या असलेल्या रूग्णांनी दह्याचं सेवन चुकूनही करू नये. यात कॅल्शिअम भरपूर असतं जे हाडांसाठी फायदेशीर असतं. पण ही समस्या असल्यावर दह्याचं सेवन केल्याने जॉईंट्स मधील वेदना वाढू शकते. दह्याऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.
अस्थमा
जर तुम्हाला अस्थमा असेल तर दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण दह्यामुळे अस्थमाचा अटॅक ट्रिगर होण्यााचा धोका असतो.
ल्यूकोरिया
जर तुम्हाला ल्यूकोरिया म्हणजे जास्त व्हाईट व्हजायनल डिस्चार्जची समस्या असेल तर दही खाऊ नये. दह्याचं सेवन केलं तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
हाय कोलेस्ट्रॉल
हाय कोलेस्ट्रॉल असल्याननंतर फुल फॅट दह्याचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणखी वाढू शकतं. अशात दह्या ऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.
बद्धकोष्ठता
तसं तर दही गट हेल्थसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पण जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता, ब्लोटिंग सारख्या समस्या असेल तर दह्याचं सेवन करू नये. याने समस्या अधिक वाढू शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…