आरोग्य

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे फायदे-तोटे

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

शेंगदाण्यामध्ये आढळणाऱ्या मिनरल्स रेंजचा सामान्य आरोग्यावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः एचडीएल (गुड) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शेंगदाणे उच्च फायबर, प्रोटीन कंटेंटमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्यांसाठी आरोग्यदायी नाश्तासुद्धा ठरू शकतात.

हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण करण्यापलीकडे, शेंगदाण्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स, रेझवेराट्रोलसह मेंदूच्या ऊतींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव करून संज्ञानात्मक बिघडण्याची शक्यता कमी करण्यास मदत करू शकतात. याशिवाय व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे शेंगदाण्यामध्ये आढळणारे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे आहेत, जे शरीराच्या विविध प्रक्रियांना समर्थन देतात.

शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने काय होत

१) हृदयविकाराचा धोका कमी होतो.

2) वजन वाढण्यास मदत होते.

३) रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते.

४) मेंदू कार्य इन्हान्स करण्यास मदत होते (Enhanced brain function). एकूणच शेंगदाणे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

रोज शेंगदाणे खाल्ल्याने नकारात्मक परिणाम सुद्धा होतात

१) वजन वाढणे: जर तुम्ही शेंगदाण्याचे जास्त सेवन करत असाल तर कॅलरी कंटेंटमुळे तुमचे वजन वाढू शकते.

२) ॲलर्जी: ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी शेंगदाणे खाणं पूर्णपणे टाळले पाहिजे.

3) गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या: शेंगदाणे खाल्ल्यानंतर काही व्यक्तींना पचनात त्रास होऊ शकतो, जसे की सूज येणे किंवा गॅसचा त्रास होणे.

४) औषध आणि शेंगदाणे: शेंगदाणे खात असताना रक्त पातळ करणाऱ्या औषधांचे सेवन करू नये.

शेंगदाण्याच्या सेवनाचा वजन व्यवस्थापनावर परिणाम होतो का

शेंगदाण्यामध्ये गुड फॅटचे प्रमाण जास्त असले तरीही यामुळे तुमचे वजन वाढू शकते. शेंगदाण्यामध्ये असणाऱ्या हाय कॅलरी कंटेंटमुळे, शेंगदाणे कॅलरी-डेन्स फूडदेखील मानले जाते. शेंगदाणे जास्त खाल्ल्याने जास्त प्रमाणात कॅलरी वाढतात, जे कालांतराने वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे संतुलित आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश करण्याची गुरुकिल्ली ‘संयम’ आहे. त्यामुळे मूठभर स्नॅक किंवा जेवणात शेंगदाण्याचा थोडासा समावेश करून तुम्हाला फायदे मिळू शकतात.

कच्च्या, भाजलेल्या किंवा खाऱ्या शेंगदाण्यांमध्ये काय फरक आहे

शेंगदाण्याच्या वेगवगेळ्या पद्धती (कच्चे, भाजलेले किंवा खारवलेले) पोषण प्रोफाइल आणि आरोग्य फायद्यांमध्ये किंचित बदल करू शकते.

कच्चे शेंगदाणे: यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोषक, अँटिऑक्सिडंट असतात. याउलट खाऱ्या आणि भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये याचे प्रमाण कमी असते आणि ते पचण्याससुद्धा कठीण असतात. त्याचप्रमाणे हे शेंगदाणे योग्यरित्या न साठवल्यास त्यात हानिकारक जीवाणूसुद्धा असू शकतात.

भाजलेले शेंगदाणे: भाजलेले शेंगदाणे खाण्यासाठी चविष्ट तर असतात आणि पचायला सोपे जातात. हे विशिष्ट पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सची पातळीदेखील कमी करू शकते. पण, एकूणच हे फायदेशीरसुद्धा ठरू शकते.

खारे शेंगदाणे: शेंगदाण्यामध्ये मीठ टाकल्याने सोडियमचे प्रमाण वाढते, जे रक्तदाब मॉनेटर करण्यासाठी चिंतेची बाब ठरू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

7 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

7 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

23 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

23 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

23 तास ago