आरोग्य

डिप्रेशन दूर करण्यासाठी उपाय

१) आपल्याला डिप्रेशन (नैराश्य) आले, हे स्वतः मान्य करणे महत्वाचे आहे. त्यानंतरच उपायांचा विचार करता येईल. डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल कमीपणा बाळगू नये. डिप्रेशन मध्ये कुटुंबाचा व मित्रमंडळींचा मानसिक आधार खूप मोलाचा आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे.

२) डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला कामात ठेवावे. कशात तरी गुंतवून घ्यावे. आवडणारे काम करावे. काहीच करायला नको वाटत असेल तरी काहीतरी करावे. सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांपासून जाणीवपूर्वक दूर रहावे. चॅनेल वरील बातम्या पाहू नयेत.

3) एकटे बसावे असे वाटले तरी एकटे बसू नये. मित्रांबरोबर वेळ घालवावा. लांब फिरायला, ट्रीपला जावे. विनोदी सिनेमा पहावेत. गाणी, संगीत ऐकावे. लहान मुलांशी खेळावे. घरी पाळीव प्राणी असेल तर त्यांच्याशी खेळावे.

4) निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. बागेत काम करावे. आकाशातील रंग पहावे. छंदात वेळ घालवावा. विशेषतः पूर्वी आवडत असणाऱ्या गोष्टी अगदी ठरवून कराव्यात. यामुळे ते मजेदार दिवस पुन्हा येऊ शकतात.

5) प्रकृती व वयानुसार हलका व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे. दीर्घश्वसन करावे. एरोबिक्‍स करावे. याचा रक्ताभिसरण प्रक्रियेवर चांगला परिणाम होतो. छातीवर येणारे दडपण, धडधड कमी होते. एनडोर्फीन सारखी मन आनंदी ठेवणारी केमिकल शरीरात स्त्रवतात.

6) रोज किमान अर्धा तास मेडीटेशन करावे. यामुळे मन शांत होते, अस्वस्थता कमी होते. ओंकार, प्राणायाम करावा. यामुळे डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.

7) रोज पंधरा वीस मिनिटे ध्यान मुद्रा करावी. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून, अंगठा आणि तर्जनीची टोके एकमेकाला लावावी, इतर तीन बोटे सरळ ठेवावी. या मुद्रेमुळे मन शांत होते, डिप्रेशन कमी होण्यास मदत होते.

8) आहारात बदाम, जवस, ग्रीन-टी, नारळ, टमाटर, पालक यांचा समावेश करावा. अश्वगंधा पाक दुधासोबत घ्यावा. दूधात दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यावे.

9) डी-विटामिनयुक्त पदार्थ खावेत. ब्राह्मी, हिंग, शंखपुष्पी यांचे समसमान चूर्ण करून रोज घ्यावे.

10) चमेलीची फुले नैराश्य कमी करतात. या फुलांचा गंध मेंदू मधील उष्णता कमी करतो. हा प्रयोग करून पहावा.

11) समुपदेशक, कौन्सिलर यांचा सल्ला घ्यावा. त्याप्रमाणे वागण्यात बदल करावा. डॉक्टरांनी काही औषधे सुचविली असतील तर ती जरूर घ्यावीत.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

1 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

2 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

17 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

17 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

17 तास ago