ब्लोटिंग दूर करणार होममेड ड्रिंक
ब्लोटिंग दूर करण्यासाठी बडीशेप, जिरे आणि ओव्याच खास ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी ४०० ते ५०० मिलीलीटर पाणी घ्या. यात एक छोटा चमचा जिरे, बडीशेप आणि ओवा टाका. या गोष्टी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी हलक गरम करून पिऊ शकता. या पाण्याने पोट फुगण्याची समस्या दूर होईल, सोबतच याने पोटाच आरोग्य चांगल राहत. आतड्या आतून साफ होतात आणि भूकही वाढते. इतकच नाही तर या पाण्याने पचन तंत्रही चांगल राहत.
या मसाल्यांचे फायदे
बडीशेपच्या दाण्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अॅंटी ऑक्सिडेंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या होणाऱ्या नुकसानापासून वाचवततात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि फायदेशीर अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. त्याशिवाय बडीशेपच्या दाण्यांमुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते.
जिऱ्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांसोबतच अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. तसेच यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. जिऱ्याच्या सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
ओव्यामध्ये फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात. ओव्याने पोट चांगलं राहतं आणि सोबतच शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होत.
(सोशल मीडियावरून साभार)
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…