election-result
मुंबई: महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले.
मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस राज्यातील मतदार हा नक्कीच अभिनंदनास पात्र ठरला आहे. यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो.
महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार तर 6 हजार 101 इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला. 288 मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे 84.96 टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात 44.44 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…