आरोग्य

स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्या वतीने (दि 4) रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शिरुर पंचक्रोशीसह आजूबाजूच्या जेष्ठ व्यक्ती, तरुण, महिला या सर्वांनी उपस्थिती दर्शवत याचा लाभ घेतला.

 

या कार्यक्रमाची सुरवात स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. शिरुर मधील “शांताई हॉस्पिटल” च्या वतीने सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ राहुल घावटे यांनी सर्वांच्या डोळ्यांची मोफत तपासणी केली. या शिबिरास अनेक मान्यवर आवर्जुन उपस्थित होते. यावेळी 400 पेक्षा ही जास्त लोकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी नेत्रतज्ञ राहुल घावटे यांनी ज्यांचे ऑपरेशन करायचे असतील त्यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील युवा मंचचे अध्यक्ष मंगेश घावटे यांनी डॉ राहुल घावटे यांचा सन्मान केला. यावेळी शोभना पाचंगे, डॉ वैशाली साखरे, डॉ स्मिता कवाद, गीता आढाव, अनुपमा दोषी, राणी शिंदे, छाया हारदे, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, संगीता रोकडे, अर्चना गायकवाड, सुनंदा घावटे, गौतम घावटे, बाळकृष्ण कर्डिले, तुषार दसगुडे, सागर नरवडे, बंटी जोगदंड, रमेश चव्हाण, उमेश घावटे, सुभाष पोटघन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी संस्थेच्या वतीने डॉ राहुल घावटे व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

7 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

7 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

7 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

7 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

7 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

7 तास ago