आरोग्य

अशी घ्या दातांची काळजी

आपल्या एकंदर आरोग्याचा, सुद‍ृढतेचा आपल्या दातांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. दात चांगले असतील तर पचनसंस्थाही सुद‍ृढ राहते. म्हणून केवळ दात चांगले दिसावेत म्हणून नाही तर दात मुळातूनच चांगले असावेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक ठरते. घरच्या घरी दातांची दैनंदिन निगा राखली तर दातांच्या सौंदर्याला सुद‍ृढतेचीही जोड मिळू शकते. त्यासाठी फार खर्च न करता, अगदी लहानपणापासूनच दातांची काळजी कशी घेता येऊ शकते.

माणूस सोडून इतर कोणताही दात असलेला प्राणी साखर खात नाही. त्यामुळे त्यांचे दात किडतही नाहीत. त्यामुळे गोड खाण्यावर नियंत्रण मिळवणे आणि गोड खाल्ल्यावर जाणीवपूर्वक दात स्वच्छ करणे गरजेचे ठरते. दातांची कीड रोखण्यासाठी फ्लुरॉइडयुक्‍त टूथपेस्टचा वापर करणेही हिताचे मानले जाते.

दररोज आणि व्यवस्थितपणे घरच्या घरी दातांची निगा राखल्यास ते दीर्घकाळ निरोगी राहतात. अर्थात यात सर्वात महत्त्वाचे असते ते दात स्वच्छ करणे. या स्वच्छतेसाठी योग्य पद्धतीने ब्रश करणे गरजेचे आहे. आपला टूथब्रश घट्ट आणि कडक असेल तर त्यामुळे हिरड्या सोलवटून निघतात आणि त्यांचे नुकसान होते. म्हणून दातांच्या स्वच्छतेसाठी मऊ केस असलेला टूथब्रश वापरणे हितकारक.

दातांच्या सौंदर्याबाबतही अजून म्हणावी तितकी जागरूकता झालेली नाही. खरेतर वेळेवर केलेल्या योग्य ट्रिटमेंटमुळे चेहर्‍याचे सौंदर्य तर वाढतंच; पण दातांचं आरोग्यही सुधारतं. म्हणूनच दातांसंदर्भातले गैरसमज दूर करून नव्या जमान्यानुसार शास्त्रशुद्ध विचाराने दातांच्या आरोग्याकडे पाहायला शिकण्यातच हित सामावलेले आहे.

आपल्या लेकराचे दात किडू द्यायचे नसतील तर काही सवयींपासून पालकांनी बाळाला जाणीवपूर्वक दूरच ठेवायला हवे. उदाहरणार्थ-बाळाला दूध पाजत निजू देणं, तोंडात बाटली ठेवून बाळाला निजवणं इत्यादी. तसेच अंगठा किंवा बोटं चोखल्याने किंवा चोखणी चोखल्याने, समोरचे दात पुढं येण्याची शक्यता वाढते. हेही टाळता येण्यासारखं असतं. साधारणत: वयाच्या सहाव्या वर्षी सर्वांत मागे एक दाढ येते. ती कायमच्या दातांपैकी असते. म्हणून तिच्या आरोग्याकडं फार लक्ष द्यायला हवं.

सर्वसाधारणपणे दाताचा रंग आणि ठेवण याविषयी जास्त चर्चा होताना दिसते. त्याहीपेक्षा अधिक महत्त्व दातांच्या आरोग्याला, स्वच्छतेला आणि सुदृढतेला द्यायला हवे.

दात व हिरड्यांसाठी त्रासदायक न ठरणार्‍या ब्रशने दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करा. ब्रश करताना त्याचे केस हे हिरड्या आणि दात यांच्यामधल्या जागेत ठेवून हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे याठिकाणी अडकून बसलेले विषाणू निघून जातात. त्यानंतर गालाच्या आतील, जीभ आणि दातांच्या चावण्याचा भाग इथं हलकेपणाने ब्रश फिरवून दात साफ करा.

आपल्या लेकराच्या कायमच्या दाताला इजा झाली तर आता काहीच उपाय नाही, अशा गैरसमजातून अनेक पालक घाबरून जातात, हातपाय गाळून बसतात. पण खरेतर उपाय सापडू शकतो. कायमच्या दाताला इजा झाल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावं. तसंच कायमच्या दातांपैकी एखादा दात पडला तर शक्य असल्यास लगेचच स्वच्छ डबीत दुधात किंवा लाळेत घालून तासाभरात डॉक्टरांकडे न्यावा. तो लगेच परत बसवता येण्याची अनेकदा शक्यता असते. ती तपासून पाहता येते.

दात घसाघसा घासू नका; तसे केल्यास हिरड्या आणि दातांचे नुकसान होण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे ते टाळा. प्रत्येक जेवणानंतर हलकेच फ्लॉसिंग करणे हा दात स्वच्छ ठेवण्याचा उत्कृष्ट उपाय आहे.

आपल्यातले अनेकजण महिनोनमहिने एकच ब्रश वापरतात. ही सवय अहितकारक आहे. विषाणू हे ब्रशच्या केसांवर वाढतात. म्हणून आपला टूथब्रश दर तीन महिन्यांनी आणि आजारपणानंतर अवश्य बदला.

ब्रश केल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर हिरड्यांतून रक्‍त आल्यास, हिरड्या लाल, सुजलेल्या किंवा नाजूक झाल्यासारखे वाटल्यास, हिरड्या दातांपासून बाजूला ओढलेल्या असल्यास, हिरड्यांना स्पर्श केल्यास आपले दात आणि हिरड्या यांच्यामधल्या जागेतून पू आल्यास, कवळी फिट बसण्याच्या पद्धतीत काही बदल झाल्यास, आपण चावत असताना आपले दात एकमेकांवर ज्या पद्धतीने बसतात त्यात काही बदल झाल्यास, आपल्या तोंडात घाण वास किंवा वाईट चव सतत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यात टाळाटाळ करू नका. यातच तुमच्या दातांचे आणि तुमच्या सर्वांगीण सुद‍ृढतेचे हित सामावलेले आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जांभूळ खाताना या चुका करु नका

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या…

17 मिनिटे ago

ताक पितानाची एक लहानशी चूक तुम्हाला पोहचवू शकते दवाखान्यात

ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके पेय मानले जाते. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर…

25 मिनिटे ago

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक! पाण्याचा थेंब न थेंब अडविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतून मजुरांना काम; एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत – महसूल मंत्री चंद्रशेखर…

28 मिनिटे ago

झिशान सिद्दीकी मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी; सिद्धार्थ कांबळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी!

मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय…

34 मिनिटे ago

न्यायालयाच्या दारात गोळीबार, राज्यात कायद्याचे भय संपले! महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : न्यायालयाच्या दारात गोळीबार होणे हे राज्यातील अराजकतेचे लक्षण आहे. गुन्हेगारांना कायद्याचे किंवा पोलिसांचे…

45 मिनिटे ago

मुंबई उत्तर पश्चिममध्ये खासदार कला-क्रीडा महोत्सवाचा महासोहळा; २८ नोव्हेंबरपासून ‘सिजन-२’चा धमाका!

२८ नोव्हेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान २८ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा; खासदार रवींद्र वायकर यांचा पुढाकार मुंबई:…

4 तास ago