‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतून मजुरांना काम; एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
मुंबई : राज्यातील पाण्याची प्रत्येक थेंब वाचवून जलसाठा वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे राज्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक करण्यात येणार आहे. नदी-नाल्यांमध्ये किमान एक मीटर पाणी अडविण्याच्या दृष्टीने पुलांची रचना करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून एकही मजूर कामाविना राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील पीक-पाणी परिस्थिती, जलसाठे, पाणीपुरवठा, रोजगार, चारा उपलब्धता आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सिडको, नैना तसेच विविध विकास प्राधिकरणांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पुलांनाही पूलवजा बंधाऱ्याचे निकष लागू राहतील. पुलाच्या बांधकामासाठी निधी कोणत्याही यंत्रणेकडून उपलब्ध झाला असला, तरी पाणी अडविण्याच्या उद्देशाने पुलांची रचना करणे आवश्यक राहणार आहे. या निर्णयामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर अडवून जलसाठा वाढविण्यास मदत होणार आहे.
तलावांतील गाळ महामार्गांच्या कामासाठी वापरणार
जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या तलावांमधील गाळ व माती रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी वापरण्याबाबत राज्य व केंद्र सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराचा मसुदा तयार झाला असून नागपूर येथील अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करार होणार आहे. या उपक्रमामुळे तलावांचे खोलीकरण होऊन त्यांची पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.
‘गाळमुक्त धरण’ अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मालगुजारी तलावांसह विविध यंत्रणांच्या मालकीच्या तलावांमधील गाळ काढण्यासाठी सुधारित दर व मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. तलावांमधून काढण्यात येणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत
राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. फार्मर आयडी नसल्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी महसूल आणि कृषी विभागाने प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. वनपट्टाधारक तसेच प्रत्यक्ष जमीन कसत असल्याचा पुरावा असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी देऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या; मात्र आवश्यक नोंदी उपलब्ध नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांची मदत देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. याशिवाय पात्रतेनुसार संबंधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसारही मदत दिली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर; चारा छावण्यांनाही मंजुरी
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सिडको, नैना तसेच विविध विकास प्राधिकरणांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पुलांनाही पूलवजा बंधाऱ्याचे निकष लागू राहतील. पुलाच्या बांधकामासाठी निधी कोणत्याही यंत्रणेकडून उपलब्ध झाला असला, तरी पाणी अडविण्याच्या उद्देशाने पुलांची रचना करणे आवश्यक राहणार आहे. या निर्णयामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर अडवून जलसाठा वाढविण्यास मदत होणार आहे.
तलावांतील गाळ महामार्गांच्या कामासाठी वापरणार
जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या तलावांमधील गाळ व माती रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी वापरण्याबाबत राज्य व केंद्र सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराचा मसुदा तयार झाला असून नागपूर येथील अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करार होणार आहे. या उपक्रमामुळे तलावांचे खोलीकरण होऊन त्यांची पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वीजजोडणीअभावी रखडलेल्या योजनांना तातडीने वीजजोडणी देण्याबरोबरच टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या भागांतील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत.
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतून आलेल्या मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून चारा पुरवठ्यासाठी यापूर्वीचे दरही मंजूर करण्यात आले आहेत. गायरान जमिनीवर गोशाळा उभारण्यास इच्छुक संस्थांना दोन ते तीन वर्षांसाठी भाडेपट्ट्याने जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय विचाराधीन आहे. तसेच ग्रामपंचायतींच्या प्रस्तावानुसार गायरान जमिनीवर दोन ते तीन एकर क्षेत्रफळाचे छोटे तलाव उभारण्याबाबतही शासन विचार करीत आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, रोजगारनिर्मिती, शेतकरी मदत, पाणीपुरवठा आणि पशुधनासाठी चारा उपलब्धता या सर्वच आघाड्यांवर उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या…
आपल्या एकंदर आरोग्याचा, सुदृढतेचा आपल्या दातांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. दात चांगले असतील तर पचनसंस्थाही…
ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके पेय मानले जाते. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर…
मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई : न्यायालयाच्या दारात गोळीबार होणे हे राज्यातील अराजकतेचे लक्षण आहे. गुन्हेगारांना कायद्याचे किंवा पोलिसांचे…
२८ नोव्हेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान २८ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा; खासदार रवींद्र वायकर यांचा पुढाकार मुंबई:…