आरोग्य

दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे

तळहात एकमेकांवर घासण्याचे फायदे 

1) ब्लड सर्कुलेशन:- जेव्हा आपण दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याचा चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यात काहीच अडचण येत नाही.

२) डोळ्यांना फायदा:- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तळहात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. असं केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूचा रक्तप्रवाह वाढतो. यासाठी सुरूवातीला तुम्ही हात हळूहळू रब करा आणि हळूहळू स्पीड वाढवा. जेव्हा हात हलके गरम होतील तेव्हा ते डोळ्यांवर लावा. याने डोळ्यांची दृष्टीही वाढेल आणि चमकही वाढेल.

३) टेंशन होईल कमी:- हात एकमेकांवर घासणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील चांगलं असतं. कारण याने मेंदू शांत होऊ याला आराम मिळतो. हा व्यायाम केल्याने मेंदुच्या क्रिया व्यवस्थित होतात. तुम्हाला सकारात्मक वाटतं. सकाळी ही क्रिया केल्याने तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकतं.

4) हिवाळ्यात फायदेशीर:- हिवाळ्यात अनेकदा लोकांचे हात थंडे होतात, ज्यामुळे आराम मिळवण्यासाठी लोक हात एकमेकांवर घासतात. असं केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे बोटे आखडतात, अशात हात एकमेकांवर घासल्याने मसल्स अ‍ॅक्टिव होतात आणि आखडलेपणा कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

3 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago