आरोग्य

ब्लड शुगर हाय झाल्यावर पायांवर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महाग

भारत डायबिटीसची राजधानी म्हटला जातो. कारण देशात दिवसेंदिवस शुगरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ब्लड शुगर लेव्हल जर कंट्रोल राहत नसेल, तर शरीरावर वाईट परिणाम होतात. खासकरून हाय ब्लड शुगरचे पायांवर अनेक लक्षणं दिसतात. डायबिटीसच्या रूग्णांमध्ये या समस्या कॉमन आहेत. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल वाढते, तेव्हा ब्लड वेसल्स आणि नर्वस सिस्टीमचं नुकसान होतं. ज्यामुळे पायांवर अनेक लक्षणं दिसू लागतात.

पायांवर सूज

ब्लड शुगर लेव्हल वाढल्यावर शरीरात सूज वाढू शकते. खासकरून पाय आणि टाचांवर सूज वाढते. मुख्यपणे ही समस्या ब्लड सर्कुलेशनमधील अडथळ्यामुळे होते. जर तुमच्या पायांवर सतत सूज येत असेल तर हा तुमची ब्लड शुगर लेव्हल हाय झाल्याचा संकेत असू शकतो.

पायांमध्ये वेदना किंवा जळजळ

हायपोग्लायसीमियामुळे नसांचं नुकसान होतं. ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. यामुळे पायांमध्ये जळजळ, सूज किंवा असह्य वेदना होऊ शकतात. ही समस्या सामान्यपणे पाय, टाचा आणि हातांमध्ये जाणवते.

पाय सुन्न पडणे

ब्लड शुगरची लेव्हल जास्त वाढल्यावर नर्व्स प्रभावित होऊ शकतात, ज्यामुळे पाय सुन्न पडणे किंवा झिणझिण्या जाणवू शकतात. ही लक्षणं सामान्यपणे खालच्या अवयवांमध्ये दिसून येतात.

जखमा उशीरा भरणे

जर पायांमध्ये जखम असेल किंवा कापलं असेल आणि जखम लवकर भरत नसेल तर हा ब्लड शुगर लेव्हल वाढल्याचा संकेत असू शकतो. हाय ब्लड शुगरमुळे शरीराची नॅचरल हीलिंग प्रक्रिया प्रभावित होते. ज्यामुळे जखमा उशीरा भरतात.

पायांवर खाज आणि कोरडेपणा

हाय ब्लड शुगरमुळे त्वचेवरील मॉइश्चर नष्ट होतं, ज्यामुळे पायांची त्वचा कोरडी आणि रखरखीत होते. यामुळे पायांवर खाज आणि जळजळ होते. ही समस्या डायबिटीसच्या रूग्णांमध्ये कॉमन बघायला मिळते.

पायांना जास्त गरमी लागणे

ब्लड शुगर लेव्हल वाढल्यानं पायांना जास्त गरमी जाणवते, हे सामान्यपणे नर्वस सिस्टीम प्रभावित झाल्याचं कारण असतं.

पायांमध्ये आखडलेपणा आणि कमजोरी

ब्लड शुगर लेव्हल वाढल्यानं नर्वस सिस्टीम प्रभावित होते, ज्यामुळे पायांमध्ये आखडलेपणा किंवा कमजोरी जाणवते. या स्थितीत चालण्या-फिरण्यात अडचण होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

7 तास ago

महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात; पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…

12 तास ago

बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली सूट दिली आहे का? फडणवीसांनी त्याला मुंबईत आणून चौकशी करावी

हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…

12 तास ago

‘SIR रद्द करा, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा द्या!’ युवक काँग्रेसचा एल्गार; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…

12 तास ago

सत्तेसाठी मराठा-ओबीसी संघर्ष पेटवला; फडणवीस-शिंदेंनी महाराष्ट्राचे नुकसान केले!

विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक…

12 तास ago

जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या

जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून…

12 तास ago