अनेक जणांच्या डोक्यामध्ये नेहमीच खूप कोंडा असतो. हिवाळ्यात कोंड्याचे प्रमाण वाढते हे सहाजिक आहे. पण ते जर प्रमाणाबाहेर वाढत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेण्याची तुम्हाला गरज आहे. कारण स्काल्प सोरायसिस हा प्रकार वाढत असून डोक्यात कोंडा असणाऱ्या १० पैकी ६ जणांना हा त्वचाविकार असतो, असं तज्ज्ञ सांगत आहेत. हा आजार नेमका काय आहे आणि डोक्यात नेहमी होणारा कोंडा आणि स्काल्प सोरायसिस या दोघांमधला फरक कसा ओळखायचा.
स्काल्प सोरायसिस म्हणजे काय
स्काल्प सोरायसिस हे एक व्हायरल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असून औषधोपचारांनी ते बरे होऊ शकते. या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सामान्य त्वचेच्या पेशींवर हल्ला करत असल्याने जळजळ होते. टाळूवरील त्वचेच्या पेशी खूप लवकर पुनरुत्पादित होतात. त्यामुळे त्वचेवर पांढरट जाड ठिपके तयार होतात. त्वचेला खूप खाज येते. तसेच बऱ्याच जणांना त्यातून खूप वेदनाही होतात. कपाळ, मान, कानाच्या मागचा भाग या ठिकाणी हे चट्टे जास्त प्रमाणात आढळतात. तसेच कोणत्याही वयाच्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.
स्काल्प सोरायसिसची लक्षणे काय
१) डोक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा होतो. डोक्याच्या त्वचेवरून पांढरट बुरशीचे अक्षरशः पापुद्रे निघतात.
२) काही पापुद्रे तर जाडसर आणि फुगलेलेही असू शकतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेचा काही भाग पुर्णपणे झाकला जातो.
३) टाळूवरची त्वचा खूप कोरडी पडते आणि तिला खूप खाज सुटते.
4) डोक्यात जखमा होऊन त्यातून बऱ्याचदा रक्तस्त्रावही होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…
हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…
विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक…
जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून…