आरोग्य

लिव्हरचं काम बिघडायला लागलं की शरीरात दिसतात ‘ही’ लक्षण

शरीरातील वेगवेगळी अवयवं वेगवेगळी कामं करतात. त्यात लिव्हरचं काम खूप जास्त महत्वाचं असतं. शरीर डिटॉक्स करण्यासोबतच लिव्हर शरीरासाठी 500 पेक्षा जास्त कामं करतं. लिव्हर रक्त साफ, पचन तंत्र मजबूत करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतं. जर लिव्हरनं काम करणं बंद केलं तर शरीरात विषारी तत्व जमा होतील. आणि शरीर वेगवेगळ्या आजारांनी वेढलं जाईल. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यसेवन आणि तणावामुळे लिव्हर बिघडतं. या गोष्टींमुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सिरोसिस अशा समस्या होऊ शकतात. अशात लिव्हरमध्ये उष्णता वाढल्याचे काही संकेत शरीरात दिसतात. तेच आज आपण पाहणार आहोत.

लिव्हरमध्ये उष्णता वाढण्याची लक्षण

लिव्हरमध्ये जर उष्णता वाढली तर याची लक्षणं सगळ्यात आधी चेहऱ्यावर दिसतात. जर सतत तोंडात फोडं येत असतील, जिभेवर फोड किंवा तोंडात जळजळ होत असेल, चेहऱ्यावर पुरळ येत असेल, खाज येत असेल, सतत चिडचिड होत असेल, इतकंच नाही तर पचनास समस्या होत असेल तर लिव्हरमध्ये गडबड आहे असं समजा.

लिव्हरमध्ये उष्णता वाढण्याचा तोंडावर प्रभाव

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनुसार, ज्या लोकांना जास्त दिवसांपासून लिव्हरची समस्या असते, त्याचा त्यांच्या तोंडावर प्रभाव दिसून येतो. लिव्हरमध्ये उष्णता वाढली तर तोंडात फोड येतात. काही लोकांच्या जिभेवर पांढरे किंवा लाल चट्टे डाग दिसतात. तसंच तोंड कोरडं पडतं, टेस्टही जाणवत नाही. अशात जास्त दिवस जर हिरड्यांमध्ये सूज असेल तर शरीरात इन्फेक्शन आणि सूज वाढते. ज्यामुळे आतड्या आणि लिव्हर दोन्हींवर प्रभाव पडतो.

लिव्हरची उष्णता कशी कमी कराल

तोंड आणि दातांची काळजी घ्या

रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासा. फ्लॉसचा वापर करा, ज्यामुळे दातांच्या मधल्या भागात जंतू आणि अन्नकण साचणार नाहीत. हिरड्यांमध्ये सूज, रक्त येणे किंवा वेदना जाणवत असतील, तर लगेच दंतवैद्याचा सल्ला घ्या.

नियमित तपासणी करा

दर काही महिन्यांनी दातांची टेस्ट करा, ज्यामुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या लवकर शोधता येतात. यामुळे लिव्हरवरील ताणही कमी राहतो.

पौष्टिक आहार घ्या

आहारात फळं, हिरव्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की डाळी यांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ लिव्हरचं कार्य सुधारतात आणि शरीरातील टॉक्सिन्स कमी करतात.

पुरेसं पाणी प्या

दिवसभरात पुरेसं पाणी प्या, त्यामुळे शरीरातील उष्णता आणि लिव्हरची गरमी कमी राहते. दिवसभरात साधारण 3 ते 4 लीटर पाणी प्यावे.

या गोष्टी टाळा

तळलेले पदार्थ, जंक फूड, मद्यपान आणि अतिप्रमाणात तेलकट अन्न पूर्णपणे टाळा. यामुळे लिव्हरवरील भार वाढतो आणि दातांवरही सड व जीवाणूंचा प्रभाव वाढतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

2 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

6 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

6 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

6 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

6 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

6 तास ago