आरोग्य

जळवात म्हणजे काय

तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळव्याची एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. जळवात आजाराला English मध्ये Cracked Heels ह्या नावाने ओळखले जाते. येथे जळवात का होतो व जळवातवरील उपायांची माहिती खाली दिली आहे.

जळवात होण्याची कारणे

जळवात होण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये

अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे,

अधिक वेळ उभे राहण्याच्या सवयीमुळे,

आरामदायी चपला, सँडल किंवा बूट न वापरण्यामुळे,

हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड वातावरणामुळे पायाची त्वचा कोरडी (dry skin) झाल्यामुळे,

जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे,

पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयीमुळे,

व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे,

डायबेटीस, हायपो-थायरॉईडीजम, लठ्ठपणा, सोरायसिस, त्वचेचे विकार यासारखे त्रास असल्यासही जळवात होऊन तळपायाला भेगा पडण्याची समस्या होत असते.

जळवाताची लक्षणे 

जळवात मध्ये तळपायाला भेगा पडतात. त्याठिकाणची त्वचा फाटते, त्वचा रुक्ष व खडबडीत होते. काहीजणांना जळवातमुळे तळपायाला भेगा पडून त्याठिकाणी जखमा, वेदना व रक्तस्राव होणे असे त्रासही होत असतात.

जळवातवर हे करा घरगुती उपाय 

१) मध

जळवातमध्ये पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी मधातील अँटी-मायक्रोबियल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म खूप उपयुक्त ठरतात. तसेच त्वचा मॉइश्चराइज होण्यासाठीही मध उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी मध लावावे. यामुळे पायाच्या भेगा व जखमा दूर होण्यास मदत होते.

२) खोबरेल तेल

खोबरेल तेलातील विशेष गुणधर्मामुळे त्वचा मॉइश्चराइज होत असते. त्यामुळे जळवातामुळे पायाला भेगा पडल्यास तेथे खोबरेल तेल लावावे. यामुळे भेगा भरून येण्यास व भेगा पडलेली डेड स्किन निघून जाण्यास, त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते.

३) कडुनिंबाचा रस

जळवातमध्ये पायाला भेगा पडल्यास कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून लावल्यास भेगा लवकर कमी होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

10 तास ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

1 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

2 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago