आरोग्य

किडनीत रक्ताची गाठ झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षण

शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात याबाबत तुम्ही कधीना कधी वाचलं असेलच. वेगवेगळ्या कारणांनी शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये या रक्ताच्या गाठी तयार होत असतात. ज्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. रीनल व्हेन थ्रोम्बोसिस एकप्रकारची रक्ताची गाठ असते. ही किडनीच्या अशा नसांमध्ये तयार होते ज्या विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. किडनीमध्ये जर रक्ताची गाठ तयार झाली तर शरीरातील विषारी तत्व पूर्णपणे बाहेर निघू शकत नाहीत. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो. त्याशिवाय अनेक केसेसमध्ये ही स्थिती जीवघेणीही ठरते.

महत्वाची बाब म्हणजे किडनी स्टोन झाल्यावर जी लक्षणं दिसतात ती ब्लड क्लॉटिंगच्या स्थितीमध्येही दिसतात. अशात स्वत:च एखाद्या निष्कर्षावर पोहोचण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि टेस्ट केली तर अधिक बरं होईल.

आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा

रीनल व्हेन थ्रोम्बोसिसची लक्षणं

किडनीमध्ये ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताची गाठ तयार होणं फारच घातक असतं. त्यामुळे याच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. जी खाली सांगण्यात आली आहेत.

पोटाच्या एका बाजूला, पाय किंवा मांड्यांमध्ये वेदना

लघवीतून रक्त येणे

ताप

उलटी किंवा मळमळ

पायांवर सूज

श्वास घेण्यास अडचण

ही लक्षणं इतरही वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसणारी असतात. त्यामुळे यांना सामान्य समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण तसं कराल तर गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो.

किडनीत रक्ताची गाठ का होते

शरीरात रक्ताच्या गाठी अनेकदा अचानकच तयार होता. याचं काही स्पष्ट असं कारण नसतं. पण काही अशा गोष्टी आहेत ज्याने याची शक्यता वाढते. यात डिहायड्रेशन, गर्भ निरोधक किंवा एस्ट्रोजन थेरपी, ट्यूमर, पाठ किंवा पोटावर जखम, किडनीच्या आजाराची फॅमिली हिस्ट्री, नेफ्रोटिक सिंड्रोम आणि ब्लड क्लोटिंग डिसऑर्डर यांचा समावेश आहे.

कशी मिळते याची माहिती

कंप्यूटेड टोमोग्राफी (CT) एंजियोग्राफी रीनल व्हेन थ्रोम्बोसिसच्या निदानासाठी सगळ्यातआधी टेस्ट करा. त्याशिवाय यूरिन टेस्ट- यूरीनालिसिस, अल्ट्रासाउंड, एमआरआयच्या माध्यमातूनही याची माहिती घेऊ शकता.

कसा टाळावा धोका

या स्थितीपासून बचाव करण्यासाठी कोणताही ठोस असा उपाय नाहीये. पण याची शक्यता कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर समस्या झाल्यावर ब्लड थिनर औषधांचं डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

8 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

8 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

9 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

9 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

9 तास ago