आरोग्य

लहान मुले माती का खातात

नवीनच रांगायला शिकणारी मुले जे दिसेल ते तोंडात घालतात. काही मुले माती खातात, पेन्सिल खातात याचे कारण काय ते आता पाहू. आहारात लोह व कॅल्शियम या क्षारांची कमतरता असल्यास, मुलाला वरचे अन्न सुरू न केल्यास, ऍनेमिया वा रक्तक्षय (कोणत्याही कारणामुळे) असल्यास मुले माती खातात. काही मुलांमध्ये, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही भावना वाढीस लागल्यानेही ते माती, पेन्सिली वगैरे खाऊन सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करतात.

कृमींची लागण झालेली मुलेही माती खातात. माती खाल्ल्याने कृमींची लागण होऊ शकते. मुलाला लोहक्षार जास्त प्रमाणात दिल्याने मुले माती खाणे बंद करतात. तसे न झाल्यास मानसिक कारणांचा शोध घ्यावा लागतो. माती खाणार्‍या मुलाच्या पाठीत धपाटा मारताना मातेने या कारणांकडे थोडे लक्ष दिल्यास त्याचे माती खाणे थांबू शकेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

3 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

9 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

9 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

10 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

10 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

10 तास ago