आरोग्य

हा योग्य आहार देईल थायरॉईडपासून सुटका

आजकाल वजन वाढायला लागले की, डाॅक्टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात. हो. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण घाबरु नका योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो.

बरं हे थायरॉईड प्रकरण नेमकं काय आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती गळ्याच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते.

थायरॉईड आहे हे कसे ओळखावे. साधारणपणे थायरॉईडची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसतात. बद्धकोष्ठता (संडासला साफ होत नाही.), शरीराचं वजन अचानक कमी जास्त होत राहते, हात पाय थंड पडतात, त्वचा कोरडी पांढरी पडते, ताण तणाव वाटतो, आळशीपणा येतो, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे, केस गळणे.

थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे.

चौरस आहार हा थायरॉईडला दूर ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो. आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते.

साखर आणि पिष्टमय पदार्थांचे मर्यादित सेवन करावे. या दोन्ही पदार्थांमुळे वजन वाढते. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.

तेल-तूप-चरबी वाढविणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्याने हृदयविकार, डायबेटिससह हॉर्मोन्सच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येतो.

दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.

हा आजार टाळण्यासाठी काय खावे.

सफरचंद खाणं हायपोथायराॅयडिज्म समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं.

बेरी गटातील फळं खावीत. स्ट्राॅबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी आणि स्ट्राॅबेरी फळांमध्ये ॲण्टिऑक्सिड्ण्टसचं प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायराॅइड ग्रंथीला होतो.

संत्री खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं. हायपोथायराॅयडिज्म समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात.

अननसात क जीवनसत्व असते. त्यामुळे अननस अवश्य खा.

आहाराची पथ्यं पाळल्यास थायरॉईड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते. थायरॉईड ची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली, पनीर, बटर, जंक फूड, काॅफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा. नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत.

एक नक्की जर आहार व्यवस्थित केला तर थायरॉईडपासून नक्की सुटका होऊ शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

28 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

2 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 दिवस ago

मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे…

2 दिवस ago

शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत

३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट  शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच…

2 दिवस ago