आरोग्य

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ पांढऱ्या भाजीमुळे कमी होईल कोलेस्टेरॉल

शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची वाढ होणं आरोग्यासाठी घातक असतं. खासकरून हृदयाच्या आरोग्यावर बॅड कोलेस्टेरॉलचा वाईट प्रभाव पडतो. हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. त्यामुळेच शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढताच डॉक्टर सावध होण्याचा सल्ला देत असतात. हाय कोलेस्टेरॉल आजकाल एक फारच कॉमन समस्या झाली आहे. याला कारण आजची अनहेल्दी लाइफस्टाईलही आहे. तेलकट पदार्थ खाणं, जंक फूड, फास्ट फूड अधिक खाणं, एक्सरसाईज न करणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचा उपाय

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच डाएटमध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करण्यास सांगितलं जातं. हिवाळ्यात मिळणारा मुळाही बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मुळ्याचं सेवन कसं कराव.

मुळ्यामधील पोषक तत्व

मुळ्यामध्ये पोटॅशिअम आणि एंथोसायनिन नावाचे तत्व असतात. हे ब्लड प्रेशर लेव्हल कमी करण्यास मदत करतात आणि शरीरातील जमा बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत मिळते. मुळाच्या पांढऱ्या भागात डायटरी फायबर असतं. हेच डायटरी फायबर बॅड कोलेस्टेरॉल आणि फॅट कमी करतं. ज्यामुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. त्यासोबतच मुळ्यामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही आढळतात. जे शरीरात कोलेस्टेरॉल लेव्हल बॅलन्स करण्यास मदत करतात. तसेच मुळात आढळणाऱ्या पोषक तत्वामुळे इतर पद्धतीनेही हार्ट, इम्यून सिस्टीम, डायजेशन सिस्टीम आणि एकंदर आरोग्याला फायदे मिळतात.

हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदे

वजन कमी होईल

भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असल्याने मुळाचं सेवन केल्यास शरीराचं मेटाबॉलिक बूस्ट होतं. अशात तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

बॉडी डिटॉक्स

रोज मुळा खाल्ल्याने शरीरात जमा विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. बॉडी डिटॉक्स झाल्यास अनेक आजारांचा धोका आपोआप कमी होतो.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

ज्या लोकांची ब्लड शुगर लेव्हल हाय असते त्यांच्यासाठी मुळा खूप फायदेशीर आहे. मुळा एक जीआय फूड आहे आणि यात डायटरी फायबर भरपूर असतं. मुळा खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

बद्धकोष्ठता होईल दूर

हिवाळ्यात होणारी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही मुळाच्या सेवन फायदेशीर ठरतं. मुळामधील डायटरी फायबर डायजेशन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

2 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

23 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago