sanju-jadhav-shirur-police
शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर ) याला पकडण्यात गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांमुळे स्वारगेट पोलिसांना अखेर यश मिळाले.
स्वारगेट पोलिसांबरोबरच पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे पोलिस आरोपी दत्तात्रय गाडे याचा कसून शोध घेत होते. आरोपी दत्तात्रय गाडे याने पुणे -अहिल्यानगर रोडवर २० ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी न्हावरा फाटा ते चौफुला रोडवर एका महिलेला चौफुला येथे सोडतो असे सांगून कर्डे घाटाच्या पुढे गेल्यावर महिलेच्या पर्स मधील ३८ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले होते. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस हवालदार संजू जाधव, संजय साळवे यांनी तपास करून दत्तात्रय गाडे याला गजाआड केले होते. या आरोपी कडून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन त्याच्याकडून सुमारे ४ लाख ८७ हजार ६५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ६ लाख रुपये किमतीच्या स्विप्ट गाडीसह असा १० लाख ८७ हजार ६५० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला होता. त्यामुळे आरोपीची बऱ्यापैकी ओळख संजू जाधव यांना होती. तो त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होता. याचा फायदा घेत गुन्हे शोध पथकाचे संजू जाधव यांनी गुणाट गाठत सहकाऱ्यांसमवेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
ड्रोनच्या साह्याने शोधत त्याला माईक वरून आवाज देत मी पोलिस संजू जाधव आहे, तू स्वाधीन हो, पळून जावू नको.. असे विश्वासात घेऊन त्याला आवाहन करण्यात आले. आरोपीने पोलिस संजू जाधव यांचा आवाज ओळखताच तात्काळ पोलिस संजू जाधव यांच्या मोबाईलवर फोन केला. व मी उसाच्या बाहेर येवून हजर होतो असा प्रतिसाद दिला व थोड्याच वेळात बाहेर येत जाधव साहेब मी बाहेर आलोय असे ड्रोन कडे पाहून ओरडत होता. तो बाहेर आल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्यांना पकडून पुढील कार्यवाहीसाठी त्याला पुणे येथे नेण्यात आले.
पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे…
आरोपी दत्तात्रय गाडे ऊसातून बाहेर आल्यानंतर तातडीने स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेत स्वताःची पाठ थापटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गुन्हा घडल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशन यांना तातडीने न कळवल्याने आरोपी पकडण्यास वेळ गेला होता. नाहीतर आरोपी तात्काळ गजाआड झाला असता. आरोपी दत्तात्रय गाडे पोलिस हवालदार संजू जाधव यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत उसातून बाहेर आला. त्याला पकडण्यास सिंहाचा वाटा असणारे पोलिस हवालदार संजू जाधव व पाटील पोलिस सोनवणे यांच्यावर शिरुर तालुक्यातील नागरीकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेमुळे राजकीय वातावरण ढवळले…
दत्तात्रय गाडे याचा माजी आमदार अशोक बापू यांच्या बॅनर वर फोटो आढळून आला आहे. त्यामुळे आमदार अशोक पवार यांच्यावर टीका होत होती. तसेच दत्तात्रय गाडे याच्या व्हॉटसअप डीपीवर आमदार माऊली कटके यांचा फोटो होता. त्यामुळे त्यांच्यावरही राजकीय टीका टिपण्णी मोठ्या प्रमाणावर होत आहे. तो कोणाचाही कार्यकर्ता असला तरी त्याला हे असले प्रकार करण्यास कोणी राजकीय पाठिंबा देत नव्हते हे नक्की.
आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…
आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…
…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड
आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…
शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…
स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…
पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…
पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…
शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…
धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…
शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार
शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…