आरोग्य

हिवाळ्यात सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आजीची पारंपरिक रेसिपी करून तर पाहा

थंडीचे दिवस म्हटलं की आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे लहान मोठे आजार होतातच. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते त्यामुळे या ऋतूत आपल्याला अनेक आजारांचा सतत सामना करावा लागतो. यातही सर्दी, खोकला, ताप हे हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारे कॉमन आजार आहेत. अशा वारंवार होणाऱ्या सर्दी – खोकल्यावर उपाय म्हणून सारख्या गोळ्या, सिरप घेण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसत. अशावेळी आपण काही घरगुती पारंपरिक उपाय देखील करुन पाहतो.

थंडीच्या दिवसांत आजारांपासून दूर राहण्यासाठी जायफळ घातलेलं दूध ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली पारंपारिक रेसिपी तुमची प्रतिकारशक्ती तर वाढवतेच पण शरीराला आतून उबदार देखील ठेवते. यासाठीच यंदाच्या थंडीत जायफळ घातलेलं दूध पिऊन हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करु शकतो. हे दूध नेमक कस करायच कशी प्यावं हे पाहा.

साहित्य

१) दूध – १ कपभर

२) मध – १ टेबलस्पून

३) लवंग – ४ ते ५ काड्या

४) छोटी वेलची – ४ ते ६

५) मोठी वेलीची – २

६) काळीमिरी – ५ ते ६

७) हळद – १ टेबलस्पून

८) दालचिनी – २ काड्या

९) जायफळ पावडर – १ टेबलस्पून

कृती

१) सगळ्यात आधी एक भांड घेऊन त्यात दूध ओतून दूध मंद आचेवर ठेवून हलकेच गरम करून घ्यावे.

२) आता दूध गरम झाल्यावर त्यात वरील सगळे खडे मसाले एक एक करुन घालावेत. ३. सगळे खडे मसाले घातल्यानंतर दूध ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर ठेवून गरम करून घ्यावे. त्यानंतर दुधाला एक उकळी काढून घ्यावी.

४) दूध व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस बंद करून दूध थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.

५) दूध थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालूंन सगळे जिन्नस मिसळून येण्यासाठी चमच्याने ढवळून घ्यावे.

६) आता सगळ्यात शेवटी दूध गाळणीने गाळून घ्यावे.

दूध कधी आणि कसे प्यावे

हे दूध रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास त्याचा सर्वाधिक फायदा आपल्या शरीराला होतो. यामुळे हिवाळ्यातील थंडीपासून तुमचे संरक्षण तर होईलच पण तुमच्या शरीराला पूर्ण पोषणही मिळेल. हे दूध तुम्ही सकाळच्या नाश्त्यातही पिऊ शकता.

हिवाळ्यात हे दूध पिण्याचे फायदे

१) थंडीच्या दिवसांत हे दूध प्यायल्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकला यांसारख्या लहान आजारांपासून तुमचा बचाव करतात.

२) यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला हिवाळ्यात होणाऱ्या आजारांशी लढण्यास मदत करतात.

३) हे दूध पचनसंस्था मजबूत करते आणिगॅस किंवा अपचन समस्यापासून संरक्षण करते.

४) रात्री झोपताना हे दूध प्यायल्याने शरीराला विश्रांती तर मिळतेच शिवाय झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.

5) हे मसाला दूध हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago