आरोग्य

रक्त शुद्ध करण्याचा घरगुती उपाय

शरीरातील रक्त अशुद्ध झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपण जे काही खातो किंवा पितो ते रक्तात मिक्स होतं. अशात जेव्हा आपण जे काही अनहेल्दी खातो त्याचेही कण रक्तात मिक्स होतात. ते साफ करण्याचं किंवा बाहेर काढण्याचं काम किडनी आणि लिव्हर करत असतं.

मात्र, अनेकदा रक्तात इतके जास्त विषारी तत्व असतात की, लिव्हर किंवा किडनीही ते बाहेर काढू शकत नाही. ते रक्तात वाढू लागतात आणि शरीराला आतून नुकसान पोहोचवत असतात. अशात हे विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी किडनी आणि लिव्हरवर जास्त दबाव पडत असल्यानं हे अवयवही डॅमेज होण्याचा धोका असतो.

रक्तात टॉक्सिन वाढण्याची कारण

डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, प्रदूषण किंवा अनहेल्दी लाइफस्टाईलमुळे रक्तात टॉक्सिन जमा होतात. हे विषारी तत्व लिव्हर आणि किडनीवर दबाव टाकतात. ज्यामुळे शरीरात आळस आणि कमजोरी जाणवते.

नॅचरल ब्लड क्लीनर कडूलिंब

कडूलिंबाची पानं हे नॅचरल डिटॉक्सिफायर असतात. कडूलिंबाची पानं किंवा त्याचं रक्त शुद्ध करण्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे. कडूलिंबात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. यानं रक्त शुद्ध होण्यासोबतच त्वचेवर ग्लो येतो आणि इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. कडूलिंबाच्या पानांची पेस्टही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

कसा कराल वापर

रोज सकाळी उपाशीपोटी ३ ते ४ कडूलिंबाची पाने चावून खावीत. त्याशिवाय ५ ते ७ पानं पाण्यात उकडून घ्या. हलकं कोमट पाणी गाळून पिऊ शकता. कोणत्याही केमिकल्सच्या वापराशिवाय तुम्ही याप्रमाणे रक्त शुद्ध करू शकता.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago