आरोग्य

टॉयलेट साफ करताना दोन क्लीनर एकत्र वापरणे ठरतेय ‘सायलेंट किलर’; चुकूनही करू नका ‘हा’ प्रयोग

एका महिलेने बाथरूम साफ करताना दोन वेगवेगळे क्लीनर (उदा. ॲसिड आणि ब्लीच) एकत्र मिसळले. तिला वाटले की दोन केमिकल्स एकत्र केल्याने स्वच्छता ‘डबल’ होईल. मात्र, दोन्ही क्लीनर एकत्र येताच त्यातून विषारी वायूची निर्मिती झाली. काही मिनिटांतच त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे तिचे प्रमाण वाचू शकले. जेव्हा आपण दोन वेगळे क्लीनर एकत्र करतो, तेव्हा त्यांच्यातील घटकांमध्ये रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे डोळ्यांना न दिसणारे पण अत्यंत विषारी वायू तयार होतात

अनेक टॉयलेट क्लीनर्समध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. जेव्हा ते ब्लीच (सोडियम हायपोक्लोराइट) सोबत मिसळले जाते, तेव्हा ‘क्लोरीन गॅस’ तयार होतो. यामुळे डोळे, नाक आणि घशात प्रचंड जळजळ होते आणि श्वास कोंडतो. अमोनियायुक्त क्लीनर (काच साफ करण्याचे लिक्विड) आणि ब्लीच एकत्र केल्यास ‘क्लोरामाइन गॅस’ तयार होतो. याने छातीत दुखणे, मळमळणे आणि फुफ्फुसात पाणी भरणे असे गंभीर आजार होऊ शकतात. ब्लीच आणि रबिंग अल्कोहोल एकत्र केल्यास ‘क्लोरोफॉर्म’ तयार होतो. यामुळे चक्कर येणे किंवा व्यक्ती बेशुद्ध पडणे असे प्रकार घडतात, जे बंद बाथरूममध्ये जीवघेणे ठरू शकतात.

दोन क्लीनरच्या मिश्रणातून निघणारा धूर हुंगल्यामुळे ‘रिएक्टिव्ह एअरवेज डिसफंक्शन सिंड्रोम’ नावाचा आजार होऊ शकतो. हा अस्थमासारखाच एक गंभीर प्रकार आहे. यामुळे फुफ्फुसांच्या नळ्या इतक्या संवेदनशील होतात की, साधी धूळ किंवा परफ्यूमच्या वासानेही त्या व्यक्तीला अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. त्यामुळे बाथरूम साफ करताना दोन क्लीनर एकत्र करून कोणताही प्रयोग करू नका. तसेच बाटलीवर दिलेल्या सूचना नेहमी वाचा. बाथरूम साफ करताना खिडकी उघडी ठेवा आणि एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा.

जर दुसरे क्लीनर वापरायचे असेल, तर आधीचे क्लीनर पाण्याने पूर्णपणे धुवून टाका. साफसफाई करताना चक्कर आली किंवा श्वास घ्यायला त्रास झाला, तर त्वरित बाहेर मोकळ्या हवेत या. जर चुकून केमिकल्स मिक्स झाले आणि त्रास सुरू झाला, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

55 मिनिटे ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

6 तास ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

8 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

2 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 दिवस ago