आरोग्य

रात्रीच जाणवणारी ‘ही’ लक्षणं सांगतात मोठ्या आजारांची भीती

झोप एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाची ठरते. कारण जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा शरीर स्वत:ला रिपेअर करण्यात आणि एनर्जी स्टोर करण्यास बिझी असतं. पण जर यादरम्यान काही वेगळी लक्षणं दिसत असतील तर ही केवळ झोपेत अडथळा नाही तर आरोग्यासंबंधी काही समस्या असू शकतात. हृदय, किडनी आणि लिव्हर जर योग्यपणे काम करत नसेल तर रात्री शरीरात काही लक्षणं दिसतात. याबाबत डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी जागरण डॉट कॉमला माहिती दिली आहे.

पुन्हा पुन्हा लघवी लागणे

जर तुम्ही रात्री एकापेक्षा जास्त वेळ लघवीसाठी जात असाल आणि जास्त पाणी प्यायल्यानं असं होत असल्याचा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. हा किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याचा किंवा डायबिटीसच्या सुरूवातीचा संकेत असू शकतो. हेल्दी किडनी रात्री यूरिन प्रोडक्शनला कंट्रोल करते, पण जर किडनीच्या फिल्टर प्रक्रियेत काही गडबड झाली तर पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागू शकतं.

झोपताच श्वास भरून येणे

जर रात्री झोपताच श्वास भरून येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा हृदय कमजोर झाल्याचा संकेत असू शकतो. जेव्हा हृदय शरीरात पुरेसं रक्त पंप करू शकत नाही तेव्हा असं होतं. ज्यामुळे फुप्फुसांमध्ये तरल पदार्थ जमा होतात आणि श्वास घेण्यास समस्या होते.

जर तुम्ही दिवसभर सामान्य राहत असाल आणि रात्री पायांवर सूज येत असेल किंवा जडपणा वाटत असेल, हलक्या वेदना होत असेल तर हा शरीरात फ्यूइड जमा झाल्याचा संकेत असू शकतो. ही गडबड अनेकदा लिव्हरचं काम बिघडल्यानं किंवा किडनीद्वारे सोडिअम व पाणी योग्यपणे फिल्टर होत नसल्यानं होते.

थकवा आणि झोपमोड

कोणतंही मेहनतीचं काम न करताही तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि पुन्हा पुन्हा झोपमोड होत असेल तर याचा संबंध लिव्हरची कार्यक्षमता आणि हार्मोन्सचं स्तर याच्याशी असू शकतो. लिव्हर शरीरातून विषारी तत्व बाहेर काढतं आणि जेव्हा हे योग्यपणे काम करत नाही तेव्हा झोप प्रभावित होते.

ही काही लक्षण रात्री झोपेदरम्यान दिसत असतील तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण ही लक्षणं वरील गंभीर समस्यांची असू शकतात. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावे.

अशी लक्षण दिसल्यावर काय कराल

रात्री पाणी कमी प्रमाणात प्या, पण शरीर डिहायड्रेट होऊ देऊ नका.

झोपण्याआधी जास्त मीठ आणि जड खाण्यापासून वाचा.

रोज ३० मिनिटं हलका व्यायाम करा.

ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि लिव्हर-किडनीच्या टेस्ट करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago