आरोग्य

वजन घटवणारा आहारच ठरतोय अडचणीचा; डाएट संपताच वजन पुन्हा वाढण्याचा धोका

वजन कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कॅलरी कमी करणाऱ्या डाएटचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. मात्र, अशा डाएटमुळे सुरुवातीला वजन वेगाने घटत असले, तरी दीर्घकाळासाठी कायम ठेवणे आव्हानात्मक असते आणि बहुतांश लोकांचे वजन पुन्हा वाढू लागते, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोंगॉन्गच्या संशोधकांनी याबाबतचा अभ्यास केला.

कॅलरी नियंत्रित ठेवल्याने वजन, कंबर कमी होण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील शर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. परिणामी, टाइप-२ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो. आहारात पुरेसे प्रथिने व फायबरयुक्त पदार्थ (भाज्या, डाळी, कडधान्ये) समाविष्ट करावेत. मीठ, अतिरिक्त साखर, स्निग्ध पदार्थ व मद्यपान कमी करावे. जेवणाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे, नियमित व्यायाम करावा व भुकेच्या नैसर्गिक संकेतांकडे लक्ष द्यावे

काय आहे कॅलरी कमी करणारे डाएट?

कॅलरी घटवणाऱ्या डाएटमध्ये व्यक्ती आपल्या दैनंदिन आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचे (कॅलरी) प्रमाण नियंत्रित करते. यामध्ये दिवसातील विशिष्ट वेळेतच जेवणे, एक दिवस सोडून अतिशय कमी कॅलरी घेणे आणि ‘फास्ट ८००’ सारख्या डाएट पद्धतींचा समावेश आहे. शरीर जितकी ऊर्जा खर्च करते, त्याहून कमी कॅलरी आहारातून घेतल्यास ते शरीरातील साठवलेली चरबी वापरू लागते व वजन कमी होते. असे डाएट वैद्यकीय देखरेखीखाली केले जाते.

वजन वाढण्याचे कारण 

शरीरातील संप्रेरकांचे बदल : वजन कमी होताच भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बदलतात व भूक वाढू लागते.

ऊर्जेचा वापर कमी होणे : वजन कमी झाल्यामुळे शरीर कमी ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे वजन घटण्याचा वेग मंदावतो.

आहाराचे पर्यावरण : बाजारात अतिप्रक्रिया केलेले अन्न स्वस्त व सहजरीत्या उपलब्ध असल्याने इच्छाशक्ती टिकवून ठेवणे कठीण जाते.

मानसिक व शारीरिक परिणाम : सतत लागणाऱ्या भुकेमुळे मूड बदलणे, झोपेवर परिणाम होणे व अन्नासोबतचे नाते बिघडणे असे प्रकार घडतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

B12 Deficiency: ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच व्हिटॅमिन B12 तपासून घ्या

शरीरात पुढे सांगितलेली काही लक्षणं दिसत असतील तर व्हिटॅमिन बी १२ लवकरात लवकर तपासून घ्या.…

6 तास ago

हातापायाला सतत सुज येते? ‘या’ गोष्टींचा संबंध असू शकतो असा तुम्ही कधी विचारही केला नसेल

हात-पायांना वारंवार सूज येत असेल तर ती केवळ थकवा किंवा जास्त वेळ उभे राहिल्यामुळेच येते…

6 तास ago

इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एन. डी. स्टुडिओची दमदार एन्ट्री; विदेशी चित्रकर्मींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

वेव्हज् फिल्म बझारमध्ये प्रथमच स्वतंत्र दालन; कोल्हापूर चित्रनगरीलाही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संधी गोवा: गोव्यात सुरू असलेल्या…

7 तास ago

बुलढाण्याचे नाव ‘जिजाऊनगर’ करा! सिंदखेडराजात १२ जानेवारीला विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

पुणे: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन विकासकामांना गती देण्यात…

7 तास ago

शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा वरिष्ठ पोलिसांकडून आढावा; अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे आव्हान

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्देशानंतर यंत्रणा सक्रिय शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था,…

7 तास ago

शिरूर! ‘आपले सरकार’ निवडीच्या मूल्यांकनामध्ये मनमानी; अनेकांच्या तक्रारी…

मांडवगण फराटा (संपत कारकुड) : शिरूर तालुक्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' निवडीत शैक्षणिक अर्हता जाहीरनाम्यातील…

15 तास ago