अ (A):- प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते. पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते.
ब १ (B1):- पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते.
ब २ (B2):- मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते. यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध यातून मिळते.
ब ३ (B3):- कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट यातून मिळते
ब५(B5):- शरीरातील शक्ती वाढवते. धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
ब६ (B6):- प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते. सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया यातून मिळते.
ब१२(B12):- पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग. यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ यातून मिळते.
फॉलिक ऍसिड:- लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते. (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस यातून मिळते.
क(C):- प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते. लिंबू वर्गातील फळे (संत्रे, मोसंबी) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे यातून मिळते.
ड(D):- कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
इ(E):- रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते. लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा यातून मिळते.
फ(F):- कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते. दाणे, काजू यातून मिळते.
के(K):- रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…