महाराष्ट्र

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण…

मुंबई: वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद पण झारखंड व पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकाना तात्काळ हटवले होते, रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशिर का लागला? असा प्रश्न उपस्थित करुन आता रश्मी शुक्ला यांना निवडणुसंदर्भातील कोणतेही काम देऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी आहेत, त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत, असे असतानाही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांच्यामुळे निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे होतील याबदद्ल शंका असल्याने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून तात्काळ हटवावे अशी मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाठवले होते, त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन शुक्ला यांना हटवण्याचे निवेदनही दिले होते त्यानंतरही शुक्ला यांना हटवले नाही. त्यानंतर ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले होते. अखेर निवडणूक आयोगाने उशिराने का होईना रश्मी शुक्ला यांना हटवले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago