आरोग्य

काय सांगता वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते ही डाळ

सामान्यपणे रोज सगळ्यात भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या डाळींचं सेवन केलं जातं. त्यात तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ या डाळींचा समावेश असतो. या डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. मात्र, अनेक लोकांना कुळीथ डाळीचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे मोजक्याच भागांमध्ये या डाळीचं सेवन केलं जातं. आज आम्ही तुम्हाला या डाळीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. एकदा जर तुम्ही या डाळीच्या सेवनाचे फायदे वाचाल तर ही डाळ नेहमीच खाल.

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाळी महत्त्वाची भूमिका निभावतात. यात महत्त्वाची डाळ म्हणजे कुळीथ. या डाळीबाबत अनेकांना फारशी माहीत नसते. या डाळीची खासियत म्हणजे याते प्रोटीन आणि पोषक तत्त्वांचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे वजन कमी होण्या सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

कुळीथ डाळीचा वापर उत्तराखंडमध्ये अधिक केला जातो. जर तुम्हालाही वजन कमी करण्याची किंवा नियंत्रणात ठेवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी कुळीथ डाळ फार फायदेशीर ठरू शकते. सामान्यपणे शाकाहारी लोक त्यांना जेवढी प्रोटीनची गरज असते ती पूर्ण करू शकत नाहीत. अशात त्यांची प्रोटीनची गरज कुळीथ डाळ पूर्ण करू शकते.

डाळीची खासियत 

एक वाटी कुळीथ डाळीमधून तुम्हाला जवळपास १५ ते १० टक्के प्रोटीन मिळू शकतं. त्यामुळे रोजच्या आहारात या डाळीचा तुम्ही समावेश करू शकता. केवळ प्रोटीनच नाही तर या डाळीमध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. वजन कमी करण्याचा हिशेबाने बघायच तर ही डाळ खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरून राहत. त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग पासून दूर राहता.

किडनी स्टोन होईल दूर

कुळीथ डाळीचं चूर्ण बनवून ते पाण्यासोबत सेवन करू शकता. त्याशिवाय भिजवलेली कुळीथ डाळ चावून खाऊ शकता. ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी 5 ते 7 दिवस रोज याचं सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होऊ शकते.

कुळीथ डाळीचे फायदे

1) कुळीथ डाळ खाल्ल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. आणि पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते. कुळीथ डाळ खाऊन महिलांना हार्मोनल बदलामुळे होणारी प्रीमेंसट्रअल ब्लोटिंगची समस्याही दूर होते.

2) रोज या डाळीचे सेवन केल्याने शरीराची पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही जे काही खाल ते व्यवस्थित पचतं.

3) कुळीथ डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तसेच या डाळीचं पीठ तुम्ही राजमा किंवा करीमध्ये टाकूनही खाऊ शकता.

4) वजन कमी करण्यास मदत करणारी कुळथीच्या डाळीचे पीठ पाण्यात मिश्रित करून सेवनही करू शकता. याने आरोग्याला अनेक फायदे होतात. दक्षिण भारतात ही या डाळीचं पीठ पाण्यात उकडून या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे दक्षिण भारतातील महिला लवकर जाडेपणाचा शिकार होत नाही, असेही सांगितले जाते.

5) कुळीथ डाळीमुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधा प्रमाणे काम करते. मेद वाढला असेल, सूज आली असेल, जंत झाले असेल तर ही डाळ फायदेशीर ठरू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago