आरोग्य

दात पडला, किडला म्हणून काढून टाकला तर पुढे काय? पाहा स्माइल सुंदर करणारा हा उपाय

दात खराब झाल्यावर ते काढून टाकणं आणि कवळी लावणं असंच अनेकजण करतात. पण आता विज्ञान फार पुढे गेले आहे. अनेक नव्या उपचारांचा शोध लागला आहे. दातांच्या विविध उपचारांपैकी एक म्हणजे डेंटल इम्प्लांट. त्याचे फायदे तोटे योग्य उपचार मात्र समजून घेतले पाहिजे.

बजाज फिनान्स, सेव्हइन, शॉप से यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स यांच्यासोबत करार केला असून त्याद्वारे आता केअर नाऊ, पे लॅटर ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आधी तपासणी, उपचार करून घ्या आणि नंतर उपचारांचे पैसे भरा अशी सवलत ग्राहकांना मिळते आहे. ऑर्थोस्क्वेअर अंतर्गत देशभरात १०० पेक्षा जास्त डेंटल क्लिनिक आहेत. त्या क्लिनिकमधील हजारो रुग्णांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमार्फत झीरो कॉस्ट इएमआय देऊ करण्यात आला आहे.

काय आहे डेंटल इम्प्लान्ट

जर दात तुटला असेल, खराब झाला असेल, तर त्या जागेवर टायटेनियम स्क्रूच्या मदतीने नवीन दात लावला जातो. एकच नाही तर बत्तीसच्या बत्तीस दात काढून लावता येतात. दात नसलेल्या जागेतील हाडात रोपण(इम्प्लान्ट) बसवला जातो. त्याला हाडांशी जुळवून घेण्यास सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तीन महिन्यांनंतर कनेक्टर व कॅप लावली जाते. हे लावलेले दात अगदी खऱ्या दातांसारखे दिसतात आणि कामही करतात.

नक्की काय चांगले कवळी का डेंटल इम्प्लान्ट

कवळी ही जुनी डेंटिस्ट्री आहे. एक साचा बनवून त्यावर ऍक्रेलिकचे दात बसवले जातात. या दातांचा मुळ आधार म्हणजे हाडे व हीरड्या. कवळीचा पूर्ण भार त्यांच्यावर असतो. वरची कवळी टाळूचा आधार घेते. कवळीमुळे हाडे व हिरड्यांवर फार जोर येतो. कवळी सैल होते आणि सरकते. मात्र डेंटल इम्प्लान्टमध्ये रोपणावर भार असतो. तोंडाच्या सर्व हालचालींचा भार रोपणाने घेतल्याने हिरड्या झिजत नाहीत.

डेंटल इम्प्लान्ट करतानाचे महत्त्वाचे मुद्दे

जबड्याची वाढ व्यवस्थित झाल्यावर कोणीही डेंटल इम्प्लान्ट करू शकते. १७ वर्षावरील महिला आणि १८ वर्षावरील पुरुष ही ट्रीटमेंट करू शकतात. वयस्करसुद्धा करू शकतात. फक्त जबडा व हाड मजबूत असायला हवे. इतर मेडिकल कंडिशन्स असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा उपचार त्रासदायक नाही. डॉक्टरांसाठी सोपे काम आहे. प्रोसिजरमध्ये थोडं दुखत. फार दुखत नाही. या ट्रीटमेंटच्या दोन उपपद्धती आहेत. तीन महिन्यांची ट्रिटमेंन्ट आणि तीन दिवसांची ट्रीटमेंट. पण डॉक्टर सुचवतात की, तीन महिन्यांचा वेळ जाऊ द्या. ट्रिटमेंट करण्याआधी साध्या सोप्या चाचण्या डॉक्टर करून घेतात.’स्पेसमेंटेनर’च्या मदतीने प्रोसिजर पुढेही ढकलता येते. चांगल्या कॉलिटीचे इंम्प्लांट तीन वर्षही टिकतात. दर सहा महिन्यांनी चेकअप करा. इंम्प्लांटची काळजी तुम्हाला व्यवस्थित घ्यावीच लागते.

डेंटल इम्प्लान्टचे दुष्परिणाम होतात का

इंम्प्लांटचे काहीही दुष्परिणाम नाहीत. पण जर काळजी नीट घेतली नाही, तर अनेक त्रास होऊ शकतो. सतत डॉक्टरांना भेटून चेकअप करून घ्या. जर एखाद्या मेडिकल कंडिशनमधून जात असाल, तर डेंटल इम्प्लान्ट केल्याचे डॉक्टरांना सांगा. ही पद्धत फार सोपी आणि चांगली आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

9 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

10 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

10 तास ago