जर आपले केस वेळेच्या आधी गळायला लागले असतील तर हि एक गंभीर समस्याआहे. दुषित भोजन आणि प्रदूषण हे कारण देखील टक्कल पडण्यासाठी असू शकतात. आपल्या शरीरात पोष्टिक तत्वांच्या कमी मुळे केस गळायला लागतात. म्हणून आपल्याला टक्कल पडण्याच्या समस्येवरील उपचार जाणून घेणे आवश्यक आहे आणि याच्यावर घरगुती उपचार देखील आहेत.
टक्कल पडण्याच्या समस्येवर उपचार कठीण आहेत, कारण जे लोक या समस्यांचा सामना करत आहेत त्यांनी आपले केस पुन्हा उगवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.पण केस गळणे हि एक नैसर्गिक समस्या आहे जी आपल्या वाढत्या वया नुसार हि वाढत जाते.जर आपण देखील या समस्येवर उपचार केले असतील आणि तरी देखील काहीच फरक पडत नसेल तर हि एक मोठी समस्या आहे. आपले केस मुळापासून निघाले असतील तर ते पुन्हा उगवणे कठीण आहे.
टक्कल वर घरगुती व आयुर्वेदिक उपाय
आपल्या प्रचीन शास्त्रात अनेक प्रकारच्याआजारांवर उपचार उपलब्ध आहेत, जर आपल्याला देखील केस गळण्याची समस्या दूर करायची असेल तर आयुर्वेदातील उपचार करू शकता आणि हे उपाय सोपे व सरळ असतात.तसेच हे उपचार खुप कमी खर्चिक असतात आणि हे उपचार आपण घरी बसून करू शकतात नैसर्गिक रूपाने आपण आपले केस परत उगवू शकता. त्याचप्रकारे याच्यात आपला वेळ देखील वाचेल आणि पैसा वाया जाणार नाही. ह्या उपचारामुळे आपले केस नैसर्गिकरित्या येतील आणि आपले केस काळे व घनदाट होतील,
मेथीचा उपयोग: मेथीचा वापर जास्त करून जेवणा मध्ये केला जातो याच्यात खूप सारे पौष्टीक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. दही देखील आपल्यासाठी खुप फायदेमंद आहे. मेथी आणि दही एकत्र मिसळुन याचा उपयोग करत असाल तर आपल्याला याचा फायदा होईल. या साठी मेथी कमीत कमी १२ तासान साठी पाण्यात भिजून ठेवा आणि नंतर मेथीला बारीक वाटूनघ्या आणि हि वाटलेली मेथी दहित मिसळून एक पेस्ट तयार करा आणि हि पेस्ट आपल्या केसांच्या मुळावर लावा. एक तासा साठी तसेचठेवा आणि नंतर केस धूऊन घ्या आपल्याला फायदा होईल. कारण मेथी आणि दही मध्ये निकोटीनिक एसिड आणि प्रोटीन चंगल्या मात्रेत असतात जो आपल्या केसांच्या मुळांपर्यंत जाऊून त्यांना पोषित करतो ज्या मुळेकेसांची वाढ़ होते.
उडीत डाळ: पण आपल्या टक्कल पडण्याच्या समस्येवर लाभदायक आहे. कारण डाळिंन मध्ये खूप प्रकारचे पोषक तत्व असतात, जे आपल्या केसांना आणि शरीराला निरोगी ठेवतात. उडीत डाळीचा उपयोग करण्यासाठी डाळीचे साल काढून उकडून घेऊन ती वाटून घेतली पाहिजे आणि रात्री झोपताना हा लेप आपल्या केसांना लावा आणि रात्रभर लाऊन ठेवा आणि फड़क्याने झाकून ठेवा. असे आपण आठवड्यातुून चार ते पाच वेळा करत असाल तर आपली केस गळण्याची समस्या दूर होते.
जेष्ठमध: ज्येष्ठमध चा उपयोग करण्यासाठी जेष्ठमध वाटन घेऊन यात दुथ आणि केसर मिसळून एक पेस्ट तयार करा आणि हि पेस्ट झोपायच्या आधी आपल्या डोक्यावर चांगल्या प्रकारे रात्रभर लाऊन ठेवा आणि फडक्याने झाकुन ठेवा. झाकुन ठेवल्यामुळे आपले इतर कपड़े खराब होणार नाहीत. सकाळी उठल्यावर केस चांगल्या प्रकारे धूउन घ्या हा लेप आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावत असालतर आपली टक्कल पडण्याची समस्या दूर होईल व केस गळणे हि थांबेल.
आवळा, ब्राम्ही तसेच भूंगराज या तिघांनाआयुर्वेदात केसांसाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते कारण हे आपल्या केसांचे गळणे थांबवतात आणि आपले केस उगवायला मदत करतात.आवळा, ब्राम्ही व भूंगराज हे केवळ केसांसाठी फायदेमंद नाही तर इतर आजारांवर देखील गुणकारी आहेत. केसांमध्ये लावण्यासाठी या तिघानाही एकत्र करून वाटून घ्या आणि हे मिश्रण एका लोखंडी कढई मध्ये फुगण्यासाठी रात्रभर ठेवा आणि सकाळी हे चुरगळून लेप बनवा आणि आपल्या केसांमध्ये 15-20 मिनीटान साठी लावा असे एका आठवड्यात दोन वेळा करा असे केल्याने केस गळती थांबेल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…