आरोग्य

रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाल्ल्याने काय होत; फायदे वाचाल तर रोज खाल

बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा. रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे वाचाल तर रोज ओवा खाल.

रात्री ओवा खाण्याचे फायदे

ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतात. कुणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कुणी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून याचं सेवन करतात. ओवा उष्ण असतो, त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे याचं सेवन केलं तर सर्दी, खोकला लगेच दूर होऊ शकतो.

ओवा खाण्याची पद्धत

ओव्याचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पदार्थात मिक्स करून करू शकता. हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याल मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील. तसेच रात्रभर एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा. सकाळी हे पाणी सेवन करा आणि ओवा चावून खा.

ओवा खाण्याचे फायदे 

कोलेस्ट्रॉल कमी होत

ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की, यात अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

सर्दी-खोकल्यापासून बचाव

बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्यापासून तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.

पोट होईल साफ

ओव्याचा वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही पोट साफ होत नसल्याची समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.

वजन कमी करण्यास मदत

ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं. जे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

वायरल इन्फेक्शनपासून बचाव

ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शनपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

46 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

22 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago