आरोग्य

यूरिक अ‍ॅसिड दूर करण्याचे उपाय

यूरिक अ‍ॅसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्य पदार्थात आढळणाऱ्या प्यूरीन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो. यूरिक अ‍ॅसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉइंट्स आणि किडन्यात जमा होतं. असं झाल्याने संधीवात सारखी समस्या आणि किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. यूरिक अ‍ॅसिडवर उपचार करण्यासाठी याच्या लक्षणांना वेळीच ओळखणं गरजेचं आहे. यूरिक अ‍ॅसिड वाढल्याची काही लक्षणं लघवी मध्ये दिसू लागतात.

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यावर दिसणारी लक्षण

लघवी मध्ये फेस: लघवी मधून फेस येणं या गोष्टीचा संकेत आहे की, यूरिक अ‍ॅसिडने छोट्या स्टोनचं रूप घेतलं आहे. जर यासोबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर वेळीच सावध व्हायला पाहिजे.

किडनी स्टोन होण: यूरिक अ‍ॅसिड जेव्हा लघवी सोबत निघत नाही तेव्हा ते क्रिस्टलचं रूप घेतं आणि किडनी मध्ये स्टोन तयार होतात. ज्यामुळे गंभीर वेदना, लघवीतून रक्त आणि पुन्हा लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होऊ शकतं.

गर्द रंगाची लघवी: गर्द किंवा लाल रंगाची लघवी येणं संकेत आहे की, किडनी मध्ये सगळं काही ठीक सुरू नाही. यातून हे दिसतं की, किडनी मध्ये यूरिक अ‍ॅसिडशी संबंधित स्टोन बनत आहे किंवा लघवी संबंधी समस्याचं एक संभावित लक्षण असू शकतं.

पुन्हा पुन्हा लघवी: काही लोकांना लघवी दरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. खासकरून किडनी मध्ये स्टोन किंवा लघवीच्या मार्गात अडथळा असणं. पुन्हा पुन्हा लघवीची ईच्छा होणे हेही एक यूरिक अ‍ॅसिड संबंधी लक्षण असू शकतं.

ही लक्षण दिसल्यावर काय करावे

जर यूरिक अ‍ॅसिड संबंधी वरील लक्षण दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जायला हवं. ते यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण बघण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.

यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी

पाणी भरपूर प्यायल्याने यूरिक अ‍ॅसिड पातळ करण्यास मदत मिळते आणि लघवीच्या माध्यमातून ते बाहेर पडतं. दिवसातून कमीत कमी १०-१२ ग्लास पाणी प्यावे.

जास्त प्यूरीन असणारे पदार्थ सेवन करणं बंद करावे, जसे की- ऑर्गन मीट, रेड मीट, समुद्री मासे आणि काही भाज्या जसे की- शतावरी व पालक.

कमी फॅट असलेले डेअरी उत्पादनं जसे की- दूध आणि दही यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण करण्यासाठी मदत करतात.

मद्यसेवन खासकरून बीअर आणि स्प्रिट, यूरिक अ‍ॅसिड उत्पादन वाढवू शकतात. यांचं सेवन बंद करावं.

हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, जे सामान्यपणे शुगर ड्रिंक्स मध्ये आढळतं. यामुळे यूरिक अ‍ॅसिड वाढू शकतं.

लठ्ठपणा हाय यूरिक अ‍ॅसिडशी संबंधित आहे. अशात कमी वजन केलं तर यूरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळेल.

चेरी किंवा चेरीचा ज्यूस यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतो.

कडधान्य, फळं आणि भाज्यांसारखे ठोस कार्बोहायड्रेट निवडा. ज्यांनी यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

13 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago