आरोग्य

रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ कोणती

रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर झोपेतून उठणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, असं एक्सपर्ट्स नेहमीच सांगत असतात. याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ काय असते? असं म्हणतात सूर्य निघण्याआधी व्यक्तीने झोपेतून उठलं पाहिजे. कारण सकाळी लवकर उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, सकाळी झोपेतून उठण्याची वेळ आणि त्याचे फायदे.

सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ

व्यक्तीने किती तास झोपलं पाहिजे याचीही एक ठरलेली वेळ आहे. तरीही लोक ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावरही बेडवर पडून असतात. जे आरोग्यासाठी नुकसान कारक असतं. त्यामुळेच एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य उगवण्या आधीच झोपेतून उठा. कारण त्यावेळी शरीराची एनर्जी लेव्हल सगळ्यात जास्त असते. सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ सकाळी ५ वाजता आहे.

रात्री किती वाजता झोपाव

निरोगी आणि हेल्दी जीवन जगण्यासाठी रोजकिमान ७-८ तास झोप घेतली पाहिजे. त्यामुळे सकाळी ५ वाजता उठण्यासाठी तुम्हाला रात्री १० वाजता झोपावं लागेल. या रूटीनमुळे तुमचं शरीर निरोगी राहील. सोबतच शरीराची एनर्जी लेव्हलही वाढेल.

योग्य वेळी न उठण्याचे नुकसान

सकाळी जर तुम्ही उशीरा झोपेतून उठत असाल तर ब्लड शुगर लेव्हल कमी आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. सोबतच सेरोटोनिन हार्मोनही कमी होऊ लागतात. व्हिटॅमिन डी ची कमतरता येऊ शकते, जे आपल्याला सकाळच्या उन्हातून मिळू शकतं. जास्त वेळ झोपल्याने शरीरात आखडलेपणा येतो, थकवा जाणवतो आणि डिप्रेशनचाही धोका राहतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago