आरोग्य

रोज ओल खोबर का खाव…

अनेकांना ओल खोबर नुसतं खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, रोज ओलं खोबर खाल्ल्याने शरीरास आरोग्यदायी असे फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनशक्ती सुधारण्यापर्यंत अनेक गुणकारी फायदे शरीरास होतात.

नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. सामान्यत: नारळाची ही गुणकारी आणि लाभदायक बाजू फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया या बहुगुणी ओलं खोबरं खआण्याचे फायदे:

1) पचनशक्ती सुधारते जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील तर रोज थोडं ओलं खोबर खावे वा पुदिणा, आलं, लसूण यापासून बनवलेल्या चटणीत ओलं खोबरं वाटून ते खावे. आहारात नक्की कोणते तेल वापरावे? जाणून घ्या तेलाचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे

2) रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. खोब-यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

3) उलट्या होत असल्यास आराम मिळतो. तुम्हाला अति उष्णतेमुळे उलट्या होत असल्यास ओलं खोबर खाल्लायस आराम मिळतो.

4) नाकातून रक्त येणे थांबते काही जणांना उष्णतेमुळे नाकातून रक्त येते. अशा लोकांनी ओलं खोब-याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

5) वजन नियंत्रित करण्यासाठी नारळाचे सेवन केल्यास वजन वाढण्याची प्रक्रिया संथ होते.

6) नारळाच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते. हे यामुळे शक्य होतं कारण नारळात ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात. ज्यातील पौष्टिक तत्व तुमच्या ब्रेन सेल्सना सक्रीय करतात आणि तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

23 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago