आरोग्य

तुम्हाला माहितही नसतील मोकळ्या हवेत श्वास घेण्याचे जबरदस्त फायदे

शहरातील सिमेंटच्या भींतीमध्ये बंदिस्त झालेल्या जीवनात स्वच्छ मोकळ्या हवेत श्वास घेण्यास कुणालाच वेळ नसतो. काम आणि परिवाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात बिझी झालेले लोक मोकळा श्वास घेण्यासही विसरले की काय असं वाटतं. अशात शहरातील धकाधकीच्या जीवनातून अचानक गावाकडील स्वच्छ ताज्या हवेत गेल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. आवडीचा पदार्थ समोर आल्यावर कसे लोक भसाभसा खातात, त्याप्रमाणे ही शुद्ध हवा पोटात भरून घ्यावी असं वाटतं. मन वेगळ्याच दुनियेत हरवतं. पण या प्रक्रियेला अंडरएस्टिमेट केलं जातं. ही एक नॅचरल सामान्य प्रक्रिया समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

फीट आणि निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी जसे की, एक्सरसाईज करतात, पौष्टिक आहार घेतात, फास्ट फूड बंद करतात, मद्यसेवन बंद करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घेतल्यानं केवळ आनंदच मिळतो असं नाही तर यानं आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. त्यामुळे मोकळ्या हवेत श्वास घेणं ही एखादी सामान्य आनंदी देणारीच गोष्ट असं मानून चालणार नाही.

मोकळ्या हवेत श्वास घेतल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. रोज मोकळ्या हवेत १० ते १५ मिनिटं बसल्यानं तुमचा मूड चांगला होतो, शरीरात ऑक्सीजन वाढतं, इम्यूनिटी वाढते आणि तणाव कमी होतो. ज्यामुळे शरीर आणि मनाला आराम मिळतो.

आपला मेंदू आणि शरीर निसर्गाच्या सानिध्यात आराम करत असतं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या एका रिसर्चनुसार, नैसर्गिक वातावरणात वेळ घालवल्यानं तणाव, डिप्रेशनची लक्षणं कमी होतात. तर आनंदाची भावना आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते. मोकळ्या हवेत श्वास घेतल्यानं काय काय फायदे मिळतात.

तणाव कमी होतो

मोकळ्या स्वच्छ हवेत श्वास घेतल्यानंतर मेंदुला आनंद मिळतो. ज्यामुळे मेंदुत हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात. मोकळ्या हवेत १० ते १५ मिनिटं मोठा श्वास घेतल्यानं मानसिक आरोग्य बूस्ट होतं. कारण असं केल्यास मेंदू शांत राहतो, शरीर रिलॅक्स होतं आणि मूड चांगला होता. याचा परिणाम असा की, तणाव आणि चिंतेची भावना दूर होते.

ऑक्सीजनचं प्रमाण वाढत

मोकळ्या, ताज्या हवेत श्वास घेतल्यानं शरीरात ऑक्सीजनची लेव्हल वाढते. ज्यामुळे मेंदुला चांगल्या पद्धतीनं काम करण्यास मदत मिळते. त्याशिवाय श्वास घेण्याच्या प्रक्रियेतही सुधारणा होते.

ताज्या हवेनं इम्यूनिटी बूस्ट होते

क्वचितच हे कुणाला माहीत असेल की, ताज्या मोकळ्या हवेत श्वास घेणं संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतं. मोकळ्या हवेत श्वास घेण्याच्या रोजच्या सवयीनं इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत मिळते. ताज्या हवेत बसल्यानं शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं, ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते. अशात अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.

सुधारते झोपेची क्वालिटी

रोज ताज्या हवेत श्वास घेतल्यानं झोपेसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानं तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारते आणि रात्री चांगली झोप येते.

पचन तंत्र सुधारत

सकाळी मोकळ्या हवेत श्वास घेतल्यानं पचन तंत्र मजबूत राहतं. यामुळे शरीराला पोटासंबंधी अनेक आजारांपासून वाचवलं जाऊ शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संसदेत चर्चा नाही, पण मंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्राचे प्रश्न! तटकरे मैदानात; ४३८ कोटींच्या निधीसह कोकणासाठी मोठ्या मागण्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…

8 तास ago

शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…

11 तास ago

संसदेत पुढील आठवडा ठरणार निर्णायक

सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…

13 तास ago

जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…

13 तास ago

परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…

13 तास ago

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…

14 तास ago