आरोग्य

घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबर

रात्री जर आपल्याजवळ कुणी झोपलेलं असेल आणि जोरजोरात घोरत असेल तर नक्कीत आपल्या झोपेचं खोबरं होतं. मग तो पती असो, आई, असो बाबा असो वा अजून कुणी. घोरण्याच्या आवाजानं झोपमोड होणं हे नक्कीच आहे. जे लोक घोरतात त्यांना याचा काही थांगपत्ता नसतो की, त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांचं काय होतं. ते निवांत जोरजोरात आवाज करत झोपलेले असतात. पंचाइत बाकीच्यांची होते. अशात योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाय आणि एक व्यायाम सांगितला आहे.

घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे व्यायाम करत असतात. पण यात सगळ्यात महत्वाची बाब ठरते नियमितता. जर हे व्यायाम किंवा योगासने नियमितपणे केली गेली नाहीत तर यांचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही. प्रणाली कदम यांनी सांगितलेले हे उपाय खूप सोपे आणि सहज करता येणारे आहेत.

घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत आणि एक योगासन करून दाखवलं आहे. 

1) झोपण्याआधी वाफ घ्यावी. याने नाक, छाती मोकळी होईल आणि रात्री घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

2) दुसरा उपाय म्हणजे झोपताना दोन्ही नाकपुड्यांमध्ये एक एक थेंब गायीचं तूप टाकणे. पण हे करत असताना या गोष्टीची काळजी घ्या की, ज्यांना कफ आणि सर्दी आहे त्यांनी हा उपाय करू नये.

3) तसेच झोपण्याआधी थोडं कोमट पाणी प्यावे. यानेही तुमचं घोरणं कमी करण्यास मदत मिळेल.

4) घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सिंहासन करू शकता. सिंहासन तुम्ही रोज केलं तर तुम्हाचा चांगलाच फायदा जाणवेल.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

22 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago