xr:d:DAF3HngnWeA:288,j:2332155941777304765,t:24013117
सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. “तुमची लेकरं-बाळं संकटात आहेत. आता मराठा समाज संकटात सापडला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कितीही वळवळ करू द्या, त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असा आक्रमक इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मराठवाड्यात काही कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले. “तुम्ही चुकीचं पाऊल उचललं आहे. मी एकनाथ शिंदे यांना प्रचंड मानणारा माणूस आहे. त्यांनी मराठ्यांच्या नोंदी शोधण्यासाठी समिती गठित केली. तब्बल 58 लाख नोंदी शोधाव्या लागल्या. यासाठी उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांना मोठी मेहनत घ्यावी लागली,” असा दावा त्यांनी केला.
याच मुद्द्यावरून मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही जरांगे यांनी गंभीर आरोप केले. “ज्या शिंदे साहेबांनी मराठ्यांना 58 लाख नोंदी दिल्या, त्यांच्याच शिरसाट या मंत्र्यांनी शिंदे साहेबांच्या आदेशाने नोंदी रद्द करण्याचा घाट घातला,” असा आरोप त्यांनी केला.
“बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली”
देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. “मुंबईला गेल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना एका शब्दानेही दुखावले नाही. त्याच फडणवीस यांच्या सांगण्यावरून बावनकुळे यांनी मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करायला सुरुवात केली. मी काय चुकीचं बोलतोय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही इशारा दिला. “बावनकुळेंना एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. जर तुम्ही चूक सुधारली नाही, तर तुमचा पक्ष खड्ड्यात गेला म्हणून समजा,” असा थेट इशारा जरांगे यांनी दिला.
“तुमची गाठ आता मराठ्यांशी आहे”
“तुम्ही कोयते हातात घेणार असाल तर मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत,” अशी आक्रमक भाषा करत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. मराठा समाजातील भाजप आमदार आणि मंत्र्यांनी फडणवीसांना सांगून बावनकुळेंची चूक सुधारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
“तुमची गाठ आता मराठ्यांशी आहे हे लक्षात ठेवा. ज्याची चूक असेल त्याला मी सोडत नाही. छगन भुजबळ यांच्याबाबत तुम्हाला माहितीच आहे,” असेही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात जरांगे पाटील सातत्याने मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि नोंदींच्या मुद्द्यावरून सरकारला घेरत आहेत. “सर्व मराठ्यांनी अगोदर समाज आणि नंतर पक्ष हे लक्षात ठेवावे. कोणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. या लोकांना आपण सत्तेवर बसवलं आहे,” असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले.
मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी…
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित…
पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष…
नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून…
मुंबई: देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्यासाठी…