महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजन पाटलांनंतर बाळराजे पाटलांचे नाव चर्चेत

मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविता येणार नसल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पाटील कुटुंबाकडून बँकेच्या राजकारणाची धुरा आता लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणारे राजन पाटील हे अनेक वर्षे बँकेचे संचालक राहिले आहेत. त्यांनी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत. आर्थिक शिस्त, नियोजनबद्ध कारभार आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे त्यांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण केला आहे.

दरम्यान, ज्या संचालक मंडळावर प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली, त्या मंडळातील सदस्यांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, अशी तरतूद बदललेल्या सहकार कायद्यात करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजन पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत पाटील कुटुंबाचे प्रतिनिधित्व कोण करणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. त्यातच लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांचे नाव संभाव्य उत्तराधिकारी म्हणून जोरदारपणे चर्चेत आले आहे.

बाळराजे पाटील यांच्याकडे पाटील कुटुंबाची सहकार क्षेत्रातील राजकीय आणि संघटनात्मक परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी येणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सत्तांतराची नव्हे, तर सोलापूरच्या सहकार क्षेत्रातील नेतृत्वबदलाचीही नांदी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

9 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

9 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

9 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

9 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

9 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

9 तास ago