महाराष्ट्र

रिॲलिटी शोच्या नावाखाली ५० लाखांचा व्यवहार; सेवानिवृत्त एचओडीची गोळी झाडून हत्या, तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर: रिॲलिटी शो सुरू करण्याच्या नावाखाली ५० लाख रुपये घेतलेल्या तरुणांनी पैशांच्या वादातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त विभागप्रमुखाची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत तिघा आरोपींना अटक केली आहे.

राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. तर विशाल विकास राठोड (वय २४), आकाश विनोद पवार (वय ३२, दोघे रा. गेवराई तांडा) आणि करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी रविवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत दिली.

रिॲलिटी शोचे स्वप्न दाखवून घेतले ५० लाख

ज्योतीनगर येथील रहिवासी राजाभाऊ लोंढे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून एचओडी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या विशाल राठोड याच्याशी त्यांची मैत्री झाली. त्यानंतर विशालने आकाश पवार व करण आडे यांची ओळख करून दिली.

या तिघांनी ‘खतरों के खिलाडी’च्या धर्तीवर ‘लव्ह ॲण्ड डेअर’ नावाचा रिॲलिटी शो सुरू करण्याचे स्वप्न रंगवले. या प्रोजेक्टसाठी सुमारे ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगून त्यांनी लोंढे यांच्याकडून पैसे घेतले.

शो सुरू न झाल्याने पैशांचा तगादा

रिॲलिटी शो सुरूच न झाल्याने लोंढे यांनी दिलेल्या पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला काही रक्कम परत करण्यात आली; मात्र नंतर पैशांच्या व्यवहारातून वाद वाढू लागले. पैशांचा तगादा वाढताच आरोपींनी लोंढे यांना संपवण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.

फार्महाउसवर पार्टी; डोक्यात गोळी

५ फेब्रुवारी रोजी विशाल राठोड व त्याचा मेहुणा आकाश पवार यांनी लोंढे यांना दौलताबाद परिसरातील एका फार्महाउसवर पार्टीसाठी नेले. तेथे मद्यपान व गप्पांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर तिघे शहराकडे निघाले असताना दौलताबाद–शहर मार्गावर आरोपींनी लोंढे यांचेच पिस्तूल हिसकावून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेह कारमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पुरला

खून केल्यानंतर आरोपींनी रात्रभर मृतदेह कारमध्येच ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी करण आडे याच्या मदतीने गेवराई तांड्याजवळ खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला. नंतर जेसीबीच्या साहाय्याने तो खड्डा पुन्हा व्यवस्थित बुजवण्यात आल्याचे तपासात समोर आले. तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मोबाईल स्टेटसवरून पोलिसांना संशय

खून केल्यानंतर आरोपींनी ८ फेब्रुवारीला लोंढे यांचा मोबाईल पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरात नेऊन सुरू केला. त्यावर “I am in personal work, don’t call anyone” असा इंग्रजीत स्टेटस ठेवण्यात आला. हे तोडक्या-मोडक्या इंग्रजीतील स्टेटस संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि आरोपींचा माग काढला.

मिसिंग तक्रारीनंतर उलगडा

लोंढे यांचे भाऊ उत्तम लोंढे (रा. सौंदरे, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. महिनाभरानंतरही तपासात प्रगती न झाल्याने त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेने तपास हाती घेतला आणि अपहरण व खुनाचा संपूर्ण कट उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

9 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

9 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

9 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

12 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

13 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

13 तास ago