महंत आदिनाथ महाराजांनी स्वतःवर वार करून घेतले जखमी
आष्टी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. गडाचे प्रमुख महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
माहितीनुसार, ही घटना सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या दिवशी महाराजांनी गडावर आलेल्या भक्तांना आणि सेवकांना काही वेळ खोलीबाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर ते स्वतः खोलीत गेले. काही वेळातच त्यांनी स्वतःवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच गडावरील सेवकांनी तातडीने दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. हर्षवर्धन तनवर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या माहितीनुसार शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढील आठ दिवस महाराजांना पूर्ण विश्रांती देण्यात येणार आहे. या कालावधीत कोणालाही त्यांना भेटण्यास परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान, चिंतेत असलेल्या भक्तांना दिलासा देण्यासाठी आदिनाथ महाराजांनी स्वतः व्हिडिओ संदेश जारी केला. “माझी तब्येत आता चांगली आहे, काळजी करू नका. मी लवकरच गडावर परत येईन,” असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.
या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय व सामाजिक नेत्यांनीही रुग्णालयात भेट देत महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वारकरी संप्रदायात मोठा मान असलेल्या महाराजांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
आदिनाथ महाराज शास्त्री यांचा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भक्तांमध्ये प्रभाव आहे. त्यामुळे या घटनेमुळे भक्तपरिवारात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गड परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून महाराज लवकर बरे व्हावेत यासाठी भक्तांकडून प्रार्थना केली जात आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…