मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे चिपळूण येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २७ फेब्रुवारीपासून या शिबिराला सुरुवात होणार असून १ मार्च रोजी सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमध्ये कोकण विभागातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या सर्व उमेदवारांसाठी हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
लहान शहरे आणि निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील प्रभावी उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांवर प्रशासनाकडे सक्षम व प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यांमध्ये राज्यातील इतर विभागांतील उमेदवारांसाठीही अशा प्रकारच्या निवासी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ॲड. गणेश पाटील यांनी दिली.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…