महाराष्ट्र

एका दिवसात ५ धक्कादायक घटना; नागपूरच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात बुधवारी घडलेल्या सलग गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. महिलांवरील अत्याचार, फसवणूक, अपघात आणि चोरीच्या घटनांनी शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 

प्रमुख घटना एका नजरेत

1) शाळकरी मुलीचा पाठलाग, विनयभंग प्रकरण

खापरखेडा परिसरात १३ वर्षीय मुलीचा पाठलाग करून गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

2) सराफा व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा

ओळखीचा गैरफायदा घेत पती-पत्नीने शेती विक्रीच्या बहाण्याने सराफा व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

3) हिट अँड रनमध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

4) ट्रकच्या चाकाखाली मजूर ठार

कामादरम्यान ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

5) भिशीची अडीच लाखांची चोरी

घरफोडीत रोख रक्कम चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.या सलग घटनांमुळे नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी कडक पोलिसी कारवाईची मागणी केली आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

4 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

4 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

4 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

4 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

5 तास ago

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…

6 तास ago