मुंबई: ‘बिग बॉस मराठी सेक्शन 5चा विजेता सुरज चव्हाण याचा मोठा चाहतावर्ग असून त्याने आपल्या दमदार खेळाने घरात वेगळं स्थान निर्माण करत ट्रॉफी पटकावली होती. ‘झापुक झुपूक’ आणि ‘बुक्कीत टेंगुळ’ सारख्या त्याच्या डायलॉग्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
सुरज सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. तो त्याची पत्नी Sanjana Gofane सोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो.
सुरज आणि संजनाने २९ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाला काही महिनेच झाले असताना आता त्यांच्या घरी ‘नवीन पाहुणा’ येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. याचं कारण म्हणजे संजनाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक खास व्हिडिओ.
या व्हिडिओमध्ये संजना Gudi Padwa निमित्त पूजा करताना दिसते. तिने पारंपरिक साडी आणि दागिन्यांमध्ये आकर्षक लूक केला आहे. मात्र या व्हिडिओला दिलेल्या ऑडिओने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
ऑडिओमध्ये एक आई आपल्या पोटातील बाळाशी संवाद साधताना ऐकू येते — “अजून तू माझ्या पोटात आहेस… पण मी तुझी प्रत्येक हलचाल ओळखते…” अशा भावनिक ओळींमुळे नेटकऱ्यांनी संजना प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावायला सुरुवात केली आहे.
पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून अनेकांनी ‘आई होणार का?’ असा थेट प्रश्नही विचारला आहे. हार्ट इमोजी आणि अभिनंदनाच्या कमेंट्सनी पोस्ट गजबजली आहे.
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, सुरज- संजना खरोखरच गुड न्यूज देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…