महाराष्ट्र

वाढदिवस माणुसकीचा! एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जे.जे. रुग्णालयात नवमाता व बालकांना वस्त्रदान

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय सोहळा नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा उत्सव असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात नवमाता व नवजात बालकांसाठी वस्त्रदानाचा हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला.

प्रसूतीनंतर सावरणाऱ्या मातांसाठी आणि या जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्या बालकांसाठी हे वस्त्रदान मायेची ऊब ठरले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवमातांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच बालकांना प्रेमाने वस्त्रे अर्पण केली. या वेळी अनेक गरजू मातांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तर ओठांवर कृतज्ञतेचे शब्द उमटले.

या उपक्रमादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी जे.जे. रुग्णालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालय प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावांवर शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल, तसेच आगामी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयातील वॉर्ड्सच्या नूतनीकरणासाठी स्वतः विशेष प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मुंबईतील या उपक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथेही डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या माध्यमातून अशाच प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

या वेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, दिलीप नाईक, जितेंद्र सपकाळ, संपर्कप्रमुख वर्षा मोरे, महिला विभागप्रमुख नीलम पवार, रेखा सुरणकर, पुणे शहर संघटक आनंद गोयल, अल्का माने, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली वाढे, संतोष सावंत, जन्नत परवीन यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजय सुरासे, डॉ. विजय कल्याणकर, डॉ. सोनाली देशमुख, डॉ. अरुण राठोड, डॉ. मयुरी वावधने, डॉ. अर्चना पाटील, चित्रा सेलवराज, नितीन कोलंबकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाअंतर्गत जे.जे. रुग्णालयातील जवळपास १,००० निवासी रुग्णांना अन्नदान देखील करण्यात आले.

माणुसकीच्या स्पर्शाने उजळलेला हा वाढदिवस अनेकांच्या आयुष्यात आशेचा आणि उत्साहाचा किरण ठरला असून, उपस्थितांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

6 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago